या प्रकरणाची देशात चर्चा! वरासोबत घेतले सात फेरे, आणि त्याच रात्री प्रियकरासोबत फरार झाली वधू….

आपण आपल्या आजूबाजूला लग्नानंतर उघडकीस आलेली प्रेम प्रकरणे आपण अनेकदा बघितली आहेत. आता लग्नाच्याच रात्री एक वधू प्रियकरासोबत फरार झाल्याची घटना उत्तर प्रदेशच्या गोंडामध्ये घडली आहे. या प्रकरणाची चर्चा देशभरात सुरू आहे.

लग्नात सात फेरे घेतल्यानंतर वधू आपल्या प्रियकरासोबत पळून गेली. मात्र याची थोडीही कल्पना कोणाला लागली नाही. सकाळी हा प्रकार उघड झाला तेव्हा खळबळ उडाली. आणि सर्वत्र या वधूची शोधाशोध सुरू झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथे गावातील एका व्यक्तीकडे 26 नोव्हेंबरच्या रात्री गोंडाच्याच मनकापुर येथून वरात आली होती. अंगणात वर्‍हाडी मंडळी वरासोबत दाखल झाले आणि मंगलकार्य सुरू झाले. यानंतर सात फेर्‍यांचा विधीसुद्धा पूर्ण झाला.

लग्नाचे विधी पूर्ण झाले आणि सर्व आराम करू लागले तेव्हा हिच संधी साधून सकाळी नववधू आपल्या प्रियकरासह घरातून फरार झाली. सकाळी जेव्हा वधु सापडत नसल्याचे वधुच्या कुटुंबियांना समजले तेव्हा त्यांना धक्का बसला. अगोदर त्यांनी कुणालाच न सांगता शोध घेण्याचा प्रयत्न केला.

नंतर काही वेळाने समजले की वधू ही प्रियकरासोबत फरार झाली आहे. आणि एकच सर्वांना धक्का बसला. मात्र अजूनही याबाबत पोलीस तक्रार दिली गेली नाही. दोन्ही बाजूच्या लोकांना माहीत झाल्यावर चर्चा होऊ नये म्हणून तक्रार दिली गेली नाही.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.