काय सांगता! विवाहित असलेला पुरुष गर्लफ्रेंडसोबत लिव्ह इनमध्ये राहत होता, आणि….

लखनऊ । सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण एकमेकांशी मैत्री करतात. मात्र सोशल मीडियाच्या मैत्रीमुळे अनेक वेगवेगळे प्रकार घडत असतात. असेच एक अत्यंत रंजक असे प्रकरण आता समोर आले आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या रामपूरमधील ढोंकपुरी टांडा परिसरातील आहे. दीड वर्षापूर्वी या तरुणाची भेट आसाममधील एका मुलीसोबत फेसबुकवरुन झाली.

दोघांची मैत्री हळहळू प्रेमात रुपांतरित झाली. यानंतर दोघेही चंदीगडमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. यादरम्यान तरुणी गर्भवती झाली. तरुणीला याबाबत काहीही भनक नव्हती की तिचा बॉयफ्रेंड विवाहित आहे. ही तरुणी गरोदर असल्याचे समजताच युवक गर्लफ्रेंडला सोडून आपल्या गावी फरार झाला.

याच काळात या मुलीने बाळाला जन्म दिला. मुलाला त्याचा हक्क मिळवून देण्यासाठी ही तरुणी त्याच्या शोधात युवकाच्या गावी पोहोचली. पोलिसांच्या मदतीने ती आपल्या बाळाच्या बापापर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरली. हे प्रकरण उघड होताच युवकाच्या घरी एकच गोंधळ उडाला.

बराच वेळ चाललेल्या गोंधळानंतर अखेर या युवकाला आपल्या गर्लफ्रेंडसोबत लग्न करावे लागले. आता त्याला आपल्या दोन्ही पत्नींसोबत राहावे लागणार आहे. हा युवक आता आपल्या दोन्ही पत्नी आणि आई-वडिलांसोबतही राहणार आहे. त्याला आता आपल्या दोन्ही बायकांसह मुलांचाही सांभाळ करावा लागणार आहे.

या वाटपानुसार आठवड्याचे पहिले तीन दिवस म्हणजेच सोमवार, मंगळवार आणि बुधवार तो आपल्या पहिल्या पत्नीसोबत राहाणार. तर, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार दुसऱ्या पत्नीसोबत. रविवारी त्याला आपल्या आई-वडिलांसोबत वेळ घालवावा लागेल.

ताज्या बातम्या

या पोलीसाच्या जागी मेहुणा करत होता पोलीस ड्युटी, ५ वर्षांनंतर असा झाला उलगडा, जाणून घ्या..

मोठी बातमी! अजित पवार यांचा ताफा आडवणार्‍या आरोग्य कर्मचाऱ्यावर लाठीचार्ज

‘लगान’ चित्रपटातील गोरी मॅम आठवते का? आज दिसते खुपच सुंदर आणि हॉट

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.