लग्नाच्या ९ दिवसानंतर सासरी आलेली मुलगी झाली गायब, नंतर प्रियकरासोबत भेटली ‘या’ अवस्थेत

अनेकदा जबरदस्ती लग्न लागल्यामुळे धक्कादायक घटना घडत असतात. आत्महत्या, हत्या अशी अनेक प्रकरणे समोर येत असतात. आता अशीच धक्कादायक बातमी पंजाबमधील जुनेजाच्या मंडिकिलियांवाली मधून समोर आली आहे.

कुटुंबाने आपले लग्न न लावून दिल्यामुळे एका प्रेमी जोडप्याने आत्महत्या केली आहे. आत्महत्या केलेल्या तरुणीचे ९ दिवसांपुर्वीच लग्न झाले होते. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव संजय (२२) आणि तरुणी अनु (१९) असे आहे.

दोघांचे प्रेमसंबंध होते. दोन्ही कुटुंबांना यांच्याबद्दल माहित नव्हते. पण तरुणीचे लग्न १५ जूनला राजस्थानच्या हनुमानगडच्या एका तरुणाशी लावून देण्यात आले होते. त्यानंतर ती सासरहून माहेरी आली होती.

२० जूनला अनु आपल्या पतीसोबत माहेरी आली होती. दुसऱ्या दिवशी पुन्हा तिला सासरी जायचे होते, पण ती अचानक घरुन गायब झाली. तसेच त्याच परिसरात राहणारा संजय पण घरी नव्हता. कुटुंबाने सगळीकडे शोधाशोध केली पण तरुणी भेटत नव्हती

त्यामुळे कुटुंबाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांना त्या तरुणीचा शोध घेण्यास सुरुवात केली.त्यावेळी पोलिसांना दोघांचे मृतदेह मंडीकिलियांवालीच्या वाटर वक्र्समध्ये मिळाले. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी हे मृतदेह पाठवले होते.

शवविच्छेदनानंतर दोघांचेही मृतदेह एसएसआय राजवीर सिंह यांनी दोन्ही कुटुंबांच्या सुपुर्त केले आहे. दोन्ही कुटुंबांनी याप्रकरणी कुठलीही तक्रार दाखल केली नाही. तसेच याप्रकरणी कुठलीही तक्रार दाखल करण्याची इच्छा नसल्याचे कुटुंबाने सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या-

हा साबण आहे का स्टील आहे का दगड? वाचा हे काय आहे आणि लोक याला का विकत घेत आहेत?
होणाऱ्या पतीला व्हिडिओ कॉल करुन तरुणीने घेतला गळफास; धक्कादायक कारण आले समोर
‘माझ्याशिवाय आणीबाणी कोणालाच कळणार नाही’, म्हणत कंगनाने दिग्दर्शकाला दाखवला थेट बाहेरचा रस्ता

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.