लगीनघाई! कोरोना झाल्याचे कळताच वधू- वराने चक्क PPE किट घालून केले लग्न…

कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून सण, उत्सव, तसेच लग्न राजकीय कार्यक्रम हे साध्या पद्धतीने केले जात आहेत. मोठे कार्यक्रम करणे अनेकांना पूढे धोक्याचे ठरले आहे. काहींनी यातही मोठे कार्यक्रम केले.

अशा परिस्थितीत राजस्थानच्या बारणमधील केळवारा कोविड सेंटर येथे पीपीडब्ल्यू (पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट) किटमध्ये एका जोडप्याने लग्न केले आहे. लग्नाच्या दिवशीच वधू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले.

हा विवाहसोहळा कॅमेर्‍यावर रेकॉर्ड करण्यात आला आणि त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या लग्नात पुजारीशिवाय एक व्यक्तीच उपस्थित आहे. सध्या या लग्नाची चर्चा संपूर्ण देशात होत आहे. लग्नाचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

विवाह सोहळ्यात कोरोनाच्या नियमांचे संपूर्ण पालन केले गेले आहे. फोटोमध्ये हे जोडपे हवन कुंडसमोर बसलेले दिसत आहेत तर लग्नाचे विधी पूर्ण करणारे पंडित सुद्धा पीपीई सूटमध्येसुद्धा होते. विवाह सोहळ्यादरम्यान वधूने पीपीई किट घालून पगडी घातली होती तर वधूनेही विधी पुर्ण करताना मास्क घातला होता. या झोडप्याने लग्न हे ठरलेल्या वेळेलाच केले आहे.

लग्नाच्या या खास व्हिडिओला सोशल मीडियावर शेकडो लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत. यासह, व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि त्यावर लोक बरेच प्रकारचे मीम्स शेअर करीत आहेत. राजस्थानसह संपूर्ण देशभरात या लग्नाची चर्चा सुरू आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.