५ वेळा लग्न, ३२ मुलींसोबत चॅटिंग, भावाच्या पत्नीवर बलात्कार, भोंदूबाबाचा कारनामा आला समोर

कानपूर । अनेकदा चित्रपटात असे दाखवले जाते की एकच व्यक्ती अनेकवेळा लग्न करतो. मात्र खऱ्या लाईफमध्ये देखील हे खरे झाले आहे. कानपूरच्या किदवई नगर पोलिसांनी एका बाबाला अटक केली आहे. त्याचा प्रताप समोर आल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

या बाबाचे नाव अनुज चेतन कठेरिया आहे. ज्याने आतापर्यंत तब्बल ५ लग्न केली आहेत. आता देखील तो ५ बायकांना लपवून तो सहावे लग्न करण्याच्या तयारीत होता. अनुजने त्याचे ४ लग्न सगळ्यांसमोर लपवून एका महिलेसोबत पाचवे लग्न केले होते. मात्र याच पत्नीने पोलिसांसमोर बाबा अनुजचा भांडाफोड केला.

यामुळे हे प्रकरण उघडकीस आले आहे. नाव आणि ओळख बदलून अनुज महिलांसोबत लग्न करत होता. त्याने पत्नीचा छळ करण्यास सुरूवात केली. ५ व्या पत्नीने मागच्या वर्षी चकेरी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार नोंदवली होती.

जेव्हा बाबाचा तपास करण्यास पोलिसांनी सुरुवात केली तेव्हा बाबा अनुज शाहजहांपूर येथे बंजारा बाबा कल्याण सेवा ट्रस्टच्या नावाखाली तंत्रमंत्राचा अड्डा चालवत होता. याठिकाणी समस्येने त्रस्त असलेल्या महिला बाबाकडे मदत मागायला यायच्या तेव्हा तो या महिलांना, युवतींना आपल्या जाळ्यात घेयचा.

अनुजने छोट्या भावाच्या पत्नीने अनुजविरोधात २०१६ मध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. यात अनुजला पोलिसांनी अटक केली होती. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. ११ मे रोजी अनुजवर कलम ३७७, ३२३, ३०७ या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

२००५ मध्ये त्याने जनपद मैनपुरी येथे राहणाऱ्या युवतीसोबत पहिले लग्न केले. दुसर लग्न बरेलीच्या युवतीसोबत २०१० मध्ये केले होते. तिसरे लग्न २०१४ मध्ये केले होते. त्यानंतर तिला सोडले. चौथ लग्न त्याने तिसऱ्या पत्नीच्या बहिणीशी केले. यामुळे त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल केले आहेत.

यामुळे जेव्हा अनुजचे सत्य तिला कळाले तेव्हा तिने आत्महत्या केली. पाचवं लग्न कानपूरच्या श्यामनगरमध्ये राहणाऱ्या युवतीसोबत २०१९ मध्ये केले होते. अखेर त्याचे कारनामे समोर आले आहेत.

ताज्या बातम्या

‘एलियन्स पृथ्वीवरच्या पुरुषांपेक्षा खूप चांगले असतात’ तरुणी पडली चक्क एलियन्सच्या प्रेमात

VIDEO: नदीत पिकनिक पडली भारी, कुटुंब अडकले पुरात, पुढे जे झाल तुम्हीच पहा

लग्न झाले मात्र ‘या’ कारणामुळे नवरी सासरी गेली नाही, अहमदनगरमध्ये धक्कादायक घटना

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.