लग्न झाले मात्र ‘या’ कारणामुळे नवरी सासरी गेली नाही, अहमदनगरमध्ये धक्कादायक घटना

अहमदनगर । लग्नात अनेक धक्कादायक घटना समोर येत असतात. अशीच एक घटना कर्जत तालुक्यातील नांदगाव येथे घडली आहे. येथे सिद्धटेकचा नवरदेव मुलगा हा नांदगाव येथील नवरी मुलीशी विवाहबद्ध झाला. लग्न समारंभ अत्यंत उत्साहात साजरा झाला.

सर्व विधी पार पडल्यानंतर कन्येला सासरी पाठविण्या पूर्वी वधूवरांना जेवू घालण्याचा कार्यक्रम सुरु झाला. मात्र वराने जेवण सुरू करण्यासाठी रितीरिवाजा प्रमाणे वधूपक्षाकडून वराच्या ताटास २०० रुपये वटकण म्हणून लावण्यात आले. आणि येथून गोंधळ निर्माण झाला.

यावर वरपक्षाकडील लोकांचे समाधान झाले नाही. यांच्याकडून वाढीव पैशाची मागणी होवू लागली. वधूपक्षाने त्यास स्पष्ट नकार दिला. यामुळे हा गोंधळ वाढतच गेला. अनेकांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र हा गोंधळ सुरूच होता.

ही प्रथा विवाहबद्ध झालेल्या वधू-वरांच्या रेशिमगाठी सोडण्यास कारणीभूत ठरवत वधुपित्याने मुलीची पाठवणीच न करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाने सर्वजण हादरून गेले, ग्रामस्थांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी कोणाचे ऐकले नाही.

बराच वेळ हा गोंधळ सुरूच राहिला. मात्र आपल्या मुलीपेक्षावर पक्षाला पैशाची अपेक्षा जास्त आहे अशा कुटुंबात आपली मुलगी पाठवायलाच नको, अशा निर्णयासाठी अखेर वधुपित्याने थेट पोलीस स्टेशनच गाठले. यामुळे तर अजूनच गोंधळ निर्माण झाला.

हा पेच सोडवण्याचे काम कर्जतचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने यांच्यावर आले यासाठी ते विवाहस्थळी पोहोचले. त्यांनी सर्व प्रकार समजून घेतला. वधूपित्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र ते निर्णयावर ठाम होते. त्यांनी कोणाचेही ऐकले नाही.

पोलीस अधिकारी माने यांनी शेवटी नववधूचा निर्णय विचारला. मात्र तिनेही आपल्या वडिलांच्या निर्णयाला पाठिंबा देत सासरला न जाण्याचा निर्णय जाहीर केले केला. यामुळे हे लग्न रद्द झाले. यामुळे याची सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे.

ताज्या बातम्या

हृदयद्रावक! रेल्वे रुळांवर पडलं होतं तरूणाचं शव; खिशातील सुसाईड नोट वाचताच सर्व हादरले

पुस्तक सोड, चखना आन, तुझा मुलगा कुठे कलेक्टर होणार आहे? पण तोच मुलगा झाला कलेक्टर, जाणून घ्या…

हनिमूनच्या पहिल्या रात्रीच झाले असे काही की नवरा-नवरीला हॉस्पिटलमध्ये करावे लागले दाखल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.