लग्न सुरू असतानाच नवऱ्याचे खरे रूप आले समोर, पॅन कार्डवरील नाव बघून मांडवात राडा…

लग्नाचे अनेक किस्से आपण बघत असतो, असाच एक किस्सा आता उत्तर प्रदेशमध्ये घडला आहे. येथील महाराजगंज जिल्ह्यातील कोल्हुई पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका निकाहादरम्यान (लग्न) प्रचंड गोंधळ झाला. याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे.

येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मौलवी निकाह लावत असताना नवरदेवाचे काही उर्दू उच्चार चुकले. त्यामुळे उपस्थितांना शंका आली. त्यानंतर नवरदेवाची चौकशी करण्यात आली. त्यामुळे नवरदेवाचे पितळ उघडे पडले. यामुळे एकच राडा झाला.

नवरदेवाचा हा प्रकार उघडकीस आला की, त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मुलासोबत आलेल्या काही जणांनी पळण्याचा प्रयत्न केला. त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सध्या ही घटना सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

दोन वर्षांपासून मुलगा मुलीच्या घरी येत होता. मात्र या दोन वर्षांत कोणालाही त्याचा संशय आला नाही. निकाह लागण्याच्या काही मिनिटांपूर्वी त्याचे पितळं उघडे पडले. कोल्हुई परिसरात राहणाऱ्या एका तरुणीचं सिद्धार्थनगरात राहणाऱ्या एका तरुणावर प्रेम होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली.

तिच्या कुटुंबियांशी त्याची ओळख झाली. घरच्यांच्या संमतीने निकाहाची तारीख ठरली. तरुणीला तरुणाच्या बाबतीत सगळ्या गोष्टी माहीत होत्या. मात्र निकाह सुरू असताना तरुण उर्दू शब्द बोलताना अडखळला. आणि सगळं पितळ उघडे पडले.

त्यामुळे मौलवीला शंका आली. मुलीकडच्यांनी मुलाची चौकशी सुरू केली. त्या दरम्यान तरुणाचे पाकिट तपासले गेले. त्यात पॅन कार्ड होते. त्यावर तरुणाचाच फोटो होता. मात्र नाव दुसऱ्याच धर्माचं होते. यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला.

मुलीकडच्यांनी मुलाला मारहाण केली. प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. यानंतरही मुलगी निकाह करण्यावर ठाम असून तिचे कुटुंबीय मात्र विरोधात आहेत. तर मुलाच्या कुटुंबियांनी निकाहाबद्दल कोणतीही कल्पना नाही. यामुळे याची सगळीकडे चर्चा सुरू आहे.

ताज्या बातम्या

रोज करा ‘हा’ घरघुती सोप्पा उपाय; गुप्तरोग बरा होतो आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढते

राजकूमार संतोषीपासून विक्रम भट्टपर्यंत ‘हे’ दिग्दर्शक त्यांच्याच अभिनेत्रीच्या प्रेमात झाले होते पागल

त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र फार वेगळा आहे, एकदम 70mm.. केदार शिंदेंची खास पोस्ट व्हायरल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.