दिल्ली | लग्न म्हणलं की धावपळ ही आलीच. आणि त्यातल्या त्यात मुलीच्या घरच्यांना सगळे नियोजन नीट करावे लागते. नातेवाईकांना काही जरी कमी पडली तरी ते लगेच नाराज होतात किंवा तोंडावर बोलून दाखवतात. काहीवेळा तर क्षुल्लक वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात होते.
सगळ्या केलेल्या कामाचा काहीच फायदा होत नाही. आता नवऱ्या मुलाच्या मेहुण्याला जेवण आवडले नाही म्हणून लग्न मोडल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये हा प्रकार घडला आहे. या लग्नात नवऱ्या मुलाच्या मेहुण्याला जेवण आवडले नव्हते.
हे प्रकरण थेट पोलिस स्टेशनपर्यंत गेले होते. मध्यस्थीने सर्व यशस्वी प्रयत्न केले पण काहीच फायदा झाला नाही. शेवटी व्हराडी नवरी मुलीशिवाय घरी परतले. हा संपूर्ण प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सध्या सगळीकडे त्याचीच चर्चा आहे.
घडले असे होते की, उत्तर प्रदेशातील बुलंद शहरामध्ये सिकंदरपूर कोटा या गावातून व्हराडी आले होते. लग्नाचे बहुतेक विधी आटोपत आले होते. दोन्हीकडे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. त्यानंतर अचानक जेवताना वाद सुरू झाला.
नवऱ्या मुलाच्या मेहुण्याला जेवण आवडले नाही. त्याने मुलीकडच्या मंडळीसमोर ही नाराजी बोलून दाखवली. मुलीच्या भावाने समजवण्याचा प्रयत्न केला पण त्याचे कोणीच ऐकले नाही. दोन्हीकडून जोरदार वाद झाला.
मुलीकडच्या लोकांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांनी हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न केला. पण तरीही काही फायदा झाला नाही आणि मुलीकडच्या लोकांनी लग्नाला नकार दिला. व्हराडी मुलीशिवाय घरी परतले.
महत्वाच्या बातम्या
शेतकऱ्यांसाठी आता बॉलीवूडही धावले! रितेश देशमुख शेतकऱ्यांना पाठिंबा देत म्हणाला..
बच्चू कडूंचे आवाहन; ७/१२ वाचवायचा असेल तर ८/१२ च्या भारत बंदमध्ये सहभागी व्हा