“आपल्याच इतकी लोकसंख्या असणाऱ्या चीनची कामगिरी ऑलिम्पिकमध्ये भारतापेक्षा चांगली आहे”

टोक्यो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारतीय खेळाडूंचे सर्वत्र कौतूक होताना दिसत आहे. मीराबाई चानूने भारताला सिल्वर मेडल जिंकून दिले आहे, पी व्ही सिंधूने भारताला ब्राँड मेडल मिळवून दिले आहे. तसेच भारतीय महिला हॉकी संघाने ऑस्ट्रेलियाला हरवत इतिहास घडवला आहे.

भारतीय खेळाडूंच्या चांगल्या प्रदर्शनामुळे देशभरात त्यांचे कौतूक केले जात आहे. असे असताना सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमुर्ती मार्कंडेय काटजू यांनी मात्र वादग्रस्त वक्तव्य केले आहे. भारताच्या तुलनेत कतारसारखे लहान देश चांगली कामगिरी करत असल्याचे काटजू यांनी म्हटले आहे.

भारताइतकीच लोकसंख्या असलेल्या चीनने आतापर्यंत ३२ सुवर्ण पदकं, २० रौप्य पदकं आणि १६ कांस्य पदकं जिंकली आहे. अगदी कतारने २ सुवर्ण पदकं आणि फिजीने १ सुवर्ण आणि १ कांस्य पदकं मिळवले आहे.

यांसारख्या छोट्या देशांनीही भारतापेक्षा चांगली कामगिरी केली आहे. तरीही आपण आनंद मानायला हवा की पाकीस्तानने अद्याप काहीही जिंकलेले नाही, असे ट्विट काटजू यांनी केले आहे.

आता काटजू यांनी केलेल्या ट्विटमुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच ट्रोल केले आहे. एगेलिटेरियन नावाच्या एका ट्विटर हँडलवरून काटजू यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे.

एसी कॅबिनमध्ये बसून टीका करणे सोपे आहे. तुम्ही या खेळाडूंना कोणत्या परिस्थितीत प्रशिक्षण घ्यावं लागतं हे पाहिलं आहे का? सरकारने जाहीर केलेला निधी त्यांच्यापर्यंत पोहचतोय का? हे तुम्हाला माहितीये का? असे म्हणत एगेलिटेरियन नावाच्या ट्विटर हँडलवरुन काटजू यांना सुनावण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

धक्कादायक! फेक कॉल केल्यामुळे पोलिसांची तरुणाला मारहाण, तरुणाचा मृत्यू
लालूप्रसाद यांनी शरद पवारांची घेतली भेट, भेटीचे कारण सांगताना लालूप्रसाद म्हणाले..
धक्कादायक! जोधा अकबर फेम अभिनेत्याला झाला ‘हा’ गंभीर आजार; जीव वाचवण्यासाठी कापावा लागला पाय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.