मारिया माफ कर, तू बरोबर होतीस; ‘आता आम्हीही सचिनला ओळखत नाही’

मुंबई | राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला देश-विदेशातून प्रचंड पाठिंबा मिळत आहे. पॉपस्टार रिहानाच्या ट्विटनंतर भारतातील सेलिब्रिटी, खेळाडू तसेच अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांनी ट्विट केले. यामुळे शेतकरी आंदोलनाचा मुद्दा पुन्हा पेटला. यामध्ये सचिन तेंडुलकर यानेही ट्विट केले. त्याने व्यक्त केलेल्या मतावर देशभरातून टीका झाली आहे.

पॉपस्टार रिहानासह विदेशातील अनेक चेहऱ्यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. तसेच भारतातील लोकांनी शेतकऱ्यांच्या मुद्दयावर बोलले पाहिजे असं म्हटले होते. यावर सचिनसह भारतातील अनेकांनी ‘भारताच्या अंतर्गत गोष्टीत लक्ष घालण्याची गरज नाही’ अशा आशयाचे ट्विट प्रसिद्ध चेहऱ्यांनी केले होते.

दरम्यान, भारतीय सोशल मीडिया युझरने रशियाची टेनिसपटू मारिया शारापोव्हाची माफी मागितली आहे. यावर तुम्हाला प्रश्न पडला असेल की या प्रकरणाशी मारियाचा काय संबंध आहे. तर तो असा की, २०१५ साली एका मुलाखतीत मी सचिन तेंडुलकरला ओळखत नाही असे मारियाने म्हटले होते. तेव्हा भारतातून तिच्यावर टीकेची झोड उठली होती.

याच घटेनेची आठवण काढत आता सोशल मीडियावर युझरने लिहिले आहे कि, ‘तू जेव्हा सचिनला ओळखत नाही असे म्हणाली होतीस तेव्हा आम्ही तुझ्यावर टीका केली होती. पण आता हे सिद्ध झाले आहे की सचिन विषयी एखाद्याला माहिती नसावी. तू बरोबर होतीस, आम्ही तुझी माफी मागतो. आम्ही ज्या पद्धतीने तुझ्याशी वागलो यासाठी..तू बरोबर होती आम्हाला माहिती नाही की सचिन कोण आहे’’.

भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही. भारतात जे काही घडत आहे, बाह्य शक्ती त्याचे प्रेक्षक होऊ शकतात परंतु सहभागी होऊ शकत नाहीत. भारतीयांना भारत माहित आहे आणि त्यांनीच निर्णय घ्यावा, चला एक राष्ट्र म्हणून एकजूट उभे राहूया. असे ट्विट सचिन तेंडुलकर यांने केले आहे.

महत्वाच्या बातम्या-
मराठमोळा दिग्दर्शक सचिनवर भडकला; ‘माझ्यासाठी क्रिकेटचा देव होता पण…..’
दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करताच ग्रेटा थनबर्ग भडकली, म्हणाली..
सचिन तेंडुलकर, विराट कोहली मोदी सरकारच्या समर्थनार्थ मैदानात
या बँकेत पैसे नाही चक्क बकऱ्या मिळतात, महाराष्ट्रात या ठिकाणी आहे ‘बकऱ्यांची बँक’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.