धक्कादायक! मराठमोळा बॅाडीबिल्डर जगदीश लाड याचं कोरोनामुळे निधन

बडोदा । आपली बॉडी कितीही चांगली असली तरी कोरोनापुढे ती कमीच आहे, याचे उदाहरण आज घडले आहे. बॉडी बिल्डिंगमधले सर्व सर्वोच्च किताब जिंकणारा मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाड याचे निधन झालं आहे. ही धक्कादायक घटना आज घडली आहे.

जगदीश अवघ्या ३४ वर्षाचा होता. येवढा तरुण आणि फिट असलेला हा बॉडीबिल्डर कोरोनापुढे हरला आहे. यावरून आपल्याला कोरोनाची तीव्रता लक्षात येईल. बडोद्यात त्याने अखेरचा श्वास घेतला.

त्याच्या निधनाने सर्वांना एकच धक्का बसला आहे. बॉडीबिल्डिंग विश्वात हळहळ व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी त्याला कोरोनाची लागण झाली होती. गेल्या वर्षी त्याने बडोद्यात व्यायमशाळा सुरु केली होती. त्यानिमित्ताने तो बडोद्यात असायचा.

त्याचे पिळदार शरीरामुळे देशात त्याचे अनेक चाहते होते. त्याचे पिळदार शरीर हे सर्वांना आकर्षित करायचे. यासाठी त्याने मोठी मेहनत घेतली होती. रोज सकाळी उठून दोन तास व्यायम, प्रोटीन्ससाठी चांगला डाएट, चिकन, अंडी, मटण रोजच्या रोज जगदीशच्या आहारात असायचा.

एक नावाजलेला चेहरा गेल्याने बॉडीबिल्डिंग विश्वाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याने नवी मुंबई महापौर श्री, महाराष्ट्र श्री चार वेळा, मिस्टर इंडिया स्पर्धेत दोन वेळा, तसेच मुंबईत झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने कांस्य पदक मिळवले होते. यामुळे त्याच्या जाण्याने मोठे नुकसान होणार आहे.

आता मात्र शरीर कितीही पिळदार असले तरी कोरोना कोणालाच सोडत नाही हे सिद्ध झाले आहे. यामुळे आता जास्त प्रमाणात काळजी घ्यावी लागणार आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना याची लागण झाली आहे.

ताज्या बातम्या

डॉक्टर नाही देवचं! पीपीई किट काढून डॉक्टरने शेअर केला फोटो; अवस्था पाहून डोळे पाणावतील

हॉलीवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकाला ऐश्वर्यासोबत एक रात्र घालवायची होती पण…

इरफान खानला झाला होता मृत्यूचा पुर्वाआभास; मुलाने केला खुलासा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.