Ghatkopar : मुंबईतील घाटकोपर परिसरात मराठी विरुद्ध अमराठी हा वाद पुन्हा एकदा चिघळला आहे. येथे *गुजराती, मारवाडी आणि जैनबहुल सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका मराठी कुटुंबाला मांसाहार केल्याच्या कारणावरून अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचा प्रकार* उघडकीस आला आहे.
“मराठी आदमी गंदा है, तुम्ही मच्छी मटण खाता” – अपमानजनक वक्तव्य*
संबंधित सोसायटीतील शाह नावाच्या व्यक्तीने एका मराठी कुटुंबावर मांसाहार केल्यामुळे टिका केली* आणि “मराठी लोक घाणेरडे असतात,” अशी विखारी भाषा वापरली. या सोसायटीत बहुसंख्य कुटुंबे जैन, मारवाडी व गुजराती आहेत*, तर फक्त चार मराठी कुटुंब राहतात. गेल्या काही दिवसांपासून मांसाहारावरून या मराठी कुटुंबांना मानसिक त्रास दिला जात होता.
घटनास्थळी मनसेचा धडक प्रवेश, आरोपी शाह गायब*
या प्रकाराची माहिती मिळताच *महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कामगार सेनेचे उपाध्यक्ष राज पार्टे* आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोसायटीत प्रवेश करून संबंधित कुटुंबीयांना जाब विचारला. मात्र, आरोप करणारा *शाह यावेळी तिथे दिसून आला नाही.* सोसायटीतील इतर रहिवाशांनी भेदभावाच्या आरोपांचे खंडन करत, “*आम्ही कोणावरही बंधन घालत नाही*” असे सांगण्याचा प्रयत्न केला.
“दररोज मराठी माणसाला त्रास, आज घुसलो आम्ही!” – राज पार्टे यांचा इशारा*
मनसे नेते राज पार्टे यांनी सोशल मीडियावर संतप्त पोस्ट शेअर करत म्हटलं आहे –
“या घाटकोपरमध्ये(Ghatkopar) रोज मराठी माणसावर खालच्या दर्जाची भाषा वापरून त्रास दिला जातो. ‘तुम मराठी लोग गंदा है, मच्छी मटण खाते हो’ असं बोललं जातं. आज आम्ही सोसायटीत घुसलो, काय ते एकदाच होऊन जाऊ दे म्हटलं… मग सगळ्यांची *फाटली*!”
भय्याजी जोशींच्या विधानानंतर वादाला उधाण*
या घटनेपूर्वी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते *भय्याजी जोशी यांनी ‘घाटकोपरची(Ghatkopar) भाषा मराठी नाही, तर गुजराती आहे’* असं वक्तव्य केलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर अशा घटनांना *सांस्कृतिक दादागिरीचे स्वरूप* मिळाल्याचे निरीक्षण काही राजकीय नेत्यांनी नोंदवले आहे.
घाटकोपरमधील हा प्रकार केवळ एक घटना नसून, मुंबईत वाढत चाललेला *मराठी विरुद्ध अमराठी संघर्ष* पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
*या घटनेचा पुढील तपास काय वळण घेतो, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.*
marathi-vs-amarathi-dispute-resurfaces-in-ghatkopar-area