मराठमोळ्या सुयशने अपघातात दोन्ही हात गमावले, पण तरी कमावले ‘अर्जुन’सह अनेक पुरस्कार

पंढरपूर | असे म्हणतात की एखाद्या खेळात जिंकायचे असेल तर तुमचे शरीर सक्षम असायला हवे, नाही तर तुम्ही जिंकणे तर दूर तुम्ही त्या खेळात सहभागीही होऊ शकत नाही, पण या विचारांना चित करण्याचे काम मनातील जिद्द करत असते.

ही गोष्ट करमाळ्याच्या सुयश जाधवने सिद्ध करून दाखवली आहे. अपघातात दोन्ही हात गमावून देखील सुयश हा एक आंतरराष्ट्रीय पातळीवरचा जलतरण पटू आहे. इतकेच नाही तर आताच्या अर्जुन पुरस्कार जाहीर झालेल्या खेळाडूंमध्ये सुयशचे देखील नाव आहे.

सुयश १२ वर्षाचा असताना एका लग्नात त्याला विजेचा झटका बसला होता. या अपघातात त्याचे दोन्ही हात भाजल्याने त्याला आपले दोन्ही हात गमवावे लागले. पण त्याचे वडील क्रीडा शिक्षक होते, त्यांना सुयशला आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू बनवायचे होते.

अपघातात दोन्ही हात गमावले होते, मात्र वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे हीच जिद्द त्याने मनात बाळगली होती. त्याच्या वडिलांना त्याला उत्कृष्ट जलतरणपटू बनवायचे होते.

सुयशचे वडील नारायण जाधव हे नावाजलेले जलतरणपटू आहेत. यामुळे त्यांनी आपल्या मुलालाही पोहण्यासाठी शिकवले दोन्ही हात नसतानाही तो एक उत्कृष्ट जलतरणपटू बनला आहे.

सुयशने आजपर्यंत १११ पदक मिळवले आहे. ज्यात राज्य सरकारचा शिवछत्रपती पुरस्कार, एकलव्य पुरस्कार असे अनेक पदके त्याने मिळवली आहे.

हात गमावल्यानंतर देखील सुयशने राज्य स्तरावर ५० सुवर्ण, राष्ट्रीय स्तरावर ३७ सुवर्ण, आंतरराष्ट्रीय स्तरावर ५ सुवर्ण पदकांसह १११ पदके मिळवली आहे, तर सुयशने २०१६ मध्ये आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताला पहिल्यांदाच सुवर्ण पदक मिळवून दिले आहे.

पुणे येथे क्रीडाधिकारी पदावर कार्यरत असणारा सुयश, सध्या कोरोनामुळे आपल्या शेतातील झोपडीत कुटुंबासोबत राहत आहे, पाच महिन्यापासून टँक आणि जिम बंद असल्याने तो पोहण्यापासून दूर गेला आहे.

दरम्यान, सुयशला भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून द्यायचे स्वप्न खुणावू लागलेले आहे. त्याला आता टोकियो ऑलम्पिकमध्ये देशाला सुवर्णपदक मिळवून द्यायचे आहे.

महत्वाच्या बातम्या-

-सुशांत प्रकरणातील मास्टरमाईंड असलेला ‘हा’ व्यक्ती सीबीआयच्या रडारवर!

-माहीला पाहिल्यावर नवऱ्याची आठवण येते; सानिया मिर्झाने केली माहीची तुलना पाकिस्तानी खेळाडूशी

-महेंद्रसिंग धोनीला पाहिले की मला माझ्या पतीची आठवण येते- सानिया मिर्झा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.