जाणून घ्या ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत महालक्ष्मीची भुमिका निभावणाऱ्या अभिनेत्रीबद्दल

टेलिव्हिजनवरील अनेक मालिका सध्या खुप जास्त प्रसिद्ध आहेत. अनेक धार्मिक मालिका देखील मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. अशीच एक मालिका काही दिवसांपूर्वी टेलिव्हिजन सुरू झाली आहे. खूप कमी वेळातच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ ही मालिका सध्या खुप गाजत आहे. या मालिकेला प्रेक्षकांनी खुप भरभरून प्रेम दिले आहे. या मालिकेसोबतच या मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांना देखील लोकांनी खुप जास्त पसंत केले आहे. आज आपण या मालिकेतील एका कलाकाराबद्दल जाणून घेणार आहोत.

या मालिकेत करवीर निवसिनी महालक्ष्मीची भुमिका निभावणाऱ्या अभिनेत्रीला प्रेक्षकांनी खुप जास्त पसंत केले आहे. या अभिनेत्रीचे नाव आहे निशा परुळेकर. निशा परुळेकर हे मराठी फिल्म इंडस्ट्रीतील खुप मोठे नाव आहे.

निशा परुळेकरचा जन्म २९ सप्टेंबर १९८४ मध्ये साली मुंबईतील कांदिवलीमध्ये झाला. निशाचे बालपण मुंबईत गेले. त्यानंतर निशाने तिचे शालेय आणि महाविद्यालयिन शिक्षण मुंबईतुनच पुर्ण केले आहे.कॉलेजमध्ये असताना निशाला अभिनय क्षेत्रात आवड निर्माण झाली होती.

पण त्यावेळी तिने कलाविश्वाकडे जास्त लक्ष दिले नाही. शिक्षण पुर्ण झाल्यानंतर निशाचे लग्न सुरेशसोबत झाले. निशाला मयूरी नावाची मुलगी देखील आहे. मुलीच्या जन्मानंतर निशाने अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला.

निशाने नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. तिने ‘टूरटूर’ नाटकात छोटीशी भुमिका निभावली होती. त्यानंतर निशाने ‘चष्मेबहादुर’ या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात खरा प्रवेश केला. या चित्रपटातील निशाच्या अभिनयाचे लोकांनी खूप जास्त कौतुक केले.

त्यानंतर निशाने सवत, लग्नाचा धुमधडाका, शंभू माझा नवसाचा, राहिले दुरवर, आम्ही चमकते तारे, बाबो अशा काही कौटुंबिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. निशाने संजय खापरे, मिलिंद गुणाजी, मकरंद अनासपुरे, भरत जाधव यांसारख्या मराठीतील मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे.

२०१२ मध्ये आलेल्या ‘तीन बायका फजिती आयका’ चित्रपटाने निशाला खरी ओळख मिळवून दिली. या चित्रपटातील निशाच्या भुमिकेला लोकांनी खुप पसंत केले होते. तिला या भुमिकेसाठी पुरस्कार देखील मिळाला होता.

२०१५ मध्ये आलेल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जीवनावर आधारित ‘महानायक वसंत तु’ चित्रपटात निशाने त्यांच्या पत्नीची भुमिका निभावली होती. अभिनयासोबतच निशाने राजकारणात देखील आपले नशीब आजमावले आहे. पण तिला त्यात यश मिळाले नाही.

निशाने टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध मालिका ‘बाळूमामाच्या नावाने चांगभलं’ मालिकेत महत्त्वाची भुमिका केली होती. आत्ता परत एकदा तिने टेलिव्हिजनवर कमबॅक केले आहे. ती दख्खनचा राजा ज्योतिबा मालिकेत महत्त्वाची भूमिका निभावत आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

महानायक अमिताभ बच्चनची सुन ऐश्वर्याची प्रॉपर्टी ऐकून तुम्ही थक्क व्हाल; आहे करोडोची मालकीण

आमिषा पटेलचे करिअर खराब करण्यासाठी खुपच खालच्या स्थराला गेली होती करीना कपूर

या’ अभिनेत्यांसोबत जोडले गेले होते सोनाली बेंद्रेचे नाव; एक तर होता विवाहित

महावीर शाह एक असे अभिनेते ज्यांच्या मृत्यूने सगळ्या फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला होता

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.