‘येऊ कशी तशी नांदायला’ मालिकेतील ओमचे खऱ्या आयुष्यातील घर आहे खुपच आलिशान; पहा फोटो

सध्या मराठी टेलिव्हिजनवर झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिका राज्य करत आहे.
काही दिवसांपूर्वीच सुरू झालेल्या येऊ कशी तशी मी नादांयला मालिकेने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. फक्त एका महिन्याच्या आतच मालिकेने नंबर वनचे स्थान मिळवले आहे.

मालिकेने टिआरपीच्या यादीत नंबर वनचे स्थान निर्माण केले आहे. मालिकेच्या वेगळ्या स्टोरीमूळे खुप कमी वेळात प्रेक्षकांना मालिकेने वेडं लावल आहे. मालिकेतील सर्वच कलाकार खुप प्रसिद्ध झाले आहे.

पण सध्या कोरोनामूळे या मालिकेचे शुटींग बंद झाले आहे. कोरोनाच्या वाढत्या संकटाला लक्षात घेता मालिकेच्या निर्मात्यांनी शुटींग बंद ठेवले आहे. म्हणून मालिकेतील सर्व कलाकार सध्या सुट्टीचा आनंद घेत आहेत. तर काही कलाकार घरी गेले आहेत.

तरुणींच्या गळ्यातील ताईत बनलेला अभिनेता शाल्व देखील त्याच्या घरी गेला आहे. शाल्वमूळचा पुण्याचा आहे. मालिकेमूळे त्याचा वेगळा चाहता वर्ग निर्माण झाला आहे.त्यामुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यात चाहत्यांना खुप रुची आहे.

सुट्टी मिळताच शाल्व त्याच्या आई वडिलांकडे पुण्याला गेला आहे. शाल्व घरी आल्याच्या आनंदात त्याच्या वडिलांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी शाल्वचा फोटो शेअर करत ‘शाल्व खुप दिवसांनी घरी आला आहे’. असे कॅप्टशन दिले आहे.

शाल्वचे पुण्यातील घर देखील खुपच सुंदर आहे. त्याने सोशल मीडियावर फोटो पोस्ट केल्या आहेत. त्यात त्याच्या घराचा सुंदर लुक दिसत आहे. शुटींगमूळे शाल्वला घरी जाता येत नव्हते. पण आत्ता मात्र तो खुप दिवसांनी घरी गेला आहे. तो सध्या कुटुंबासोबत टाईम घालवत आहे.

अभिनेता शाल्व किंजवडेकर मालिकेत ओंकारची भुमिका साकारत आहे. त्याने आत्तापर्यंत अनेक मालिका आणि हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. येऊ कशी तशी नांदायला मालिकेतून त्याने परत एकदा टेलिव्हिजनवर कमबॅक केला आहे.

शाल्वचा जन्म २५ एप्रिल १९९६ ला त्याचा जन्म झाला. त्याने पुण्यामधून शिक्षण पुर्ण केले. कॉलेजमध्ये असतानाच त्याने नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली. ब्लॅक छोटे, व्हाईट मोठे, चाळीशीतले चोर, गजब कहाणी अशा नाटकांमध्ये काम केले.

त्याने ‘हंटर’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू केला. त्यानंतर त्याने ‘मिस्टर ऑड मिसेस सदाचारी’ चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत डेब्यू केला. त्याच्या उत्तम अभिनयाने त्याला अनेक काम मिळत होते. शाल्वने मराठी जरा हटके, बकेट लिस्ट, एक सांगायचय अशा मराठी चित्रपटांमध्ये काम केले.

त्याचा अभिनय प्रेक्षकांना खुपच आवडला. त्याने हिंदी वेबसीरीजमध्ये देखील काम केले आहे. अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारा शाल्व खऱ्या आयूष्यात रिलेशनशिपमध्ये आहे. श्रेया डफलापूरकरला तो डेट करत आहे. श्रेया टिम तलाम या मराठी फॅशन ब्रॅंडची फाऊंडर आहे.

दोघे गेले अनेक दिवस एकमेकांना डेट करत आहे. मालिकेत स्वीटूच्या प्रेमात पागल झालेला ओंकार खऱ्या आयूष्यात मात्र श्रेयाला डेट करत आहे. लवकरत श्रेया आणि शाल्व लग्न करणार असल्याचे बोलले जात आहे. दोघे अनेक वेळा सोशल मिडीयावर त्यांचे फोटो शेअर करत असतात.

महत्वाच्या बातम्या –

गेल्या महिन्याभरापासून घरी बसून आहेत नट्टूकाका, शुटींगला बोलवण्यात येत नाही; कारण…

डायरेक्टरने रात्री सोबत झोपण्याची ऑफर केल्यावर मराठमोळ्या श्रुती मराठेने काय उत्तर दिले पहा…

लग्नाच्या १७ वर्षांनंतर आयशा झुल्काने पतीबद्दल केले धक्कादायक खुलासे; म्हणाली…

प्रेमात धोका मिळाल्यामूळे आजही अविवाहीत आहेत बॉलीवूडचे ‘हे’ अभिनेते

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.