“अमराठी व्यक्तीसाठी मराठी भय्ये नेते शिमगा असल्यासारखे का बोंबलत आहेत?”

दिल्ली | अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज अटक झाली. मृत्यूपूर्वी वास्तुविशारद अन्वय नाईक यांनी एक चिट्ठी लिहिली होती त्या चिट्ठीत अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवले असा आरोप करण्यात आला होता

त्यांची पत्नी आणि मुलीनेही हाच आरोप केला आहे. यावर आता दिग्दर्शक आणि निर्माते महेश टिळेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. एका अमराठी व्यक्तीसाठी मराठी भय्ये नेते का बोंबलत आहेत? असा सवाल त्यांनी केला आहे.

महेश टिळेकर नेहमी परखड मते मांडत असतात. यावेळीही त्यांनी राजकीय नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे. एका विधवा मराठी भगिनीला न्याय मिळण्यासाठी अटक करण्यात आलेल्या अमराठी व्यक्तीसाठी महाराष्ट्रातील मराठी भय्ये नेते शिमगा असल्यासारखे का बोंबलत आहेत?

सोशल मीडियावरची ही पोस्ट खूप व्हायरल होत आहे. दरम्यान, अर्णब गोस्वामी यांना अटक यासाठी झाली की, ज्या ठिकाणी अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली त्याठिकाणी पोलीसांना त्यांनी लिहिलेली चिठ्ठी मिळाली.

या चिट्ठीमध्ये अर्णब गोस्वामीसह, आयकास्ट स्लॉशस्काय मीडियाचे फिरोज शेख, मगरपट्टा येथील स्मार्ट वर्क्सचे नितेश सारडा या तिघांनी माझ्या कामाचे पैसे थकवल्याने मी आत्महत्या करत आहे असं त्या चिठीत लिहिले होते.

या आत्महत्येनंतर नाईक यांची पत्नी अक्षता नाईक यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या तक्रारीवरून कलम ३०६ अंतर्गत अर्णब गोस्वामींसह बाकीच्या दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या
मनुस्मृती प्रकरण: अमिताभ बच्चन विरोधात भाजप आमदाराकडून तक्रार दाखल 
धडाकेबाज फलंदाज रोहीत शर्माला भारतीय संघातून वगळण्याचे कारण समोर आलेच; वाचा..
रोहीत शर्मासोबत विराट आणि बीसीसीआय गलिच्छ राजकारण करताय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.