या मराठमोळ्या मुलीच्या तलवारबाजीपुढे भले भले योद्धे घायाळ होतील; पहाच एकदा व्हिडिओ

भारतासारख्या विशाल देशात न्यायालये आणि कायदा व सुव्यवस्था असूनही गुन्हेगारीचा प्रकार वाढत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या फारच मर्यादित आहे. ज्यामुळे पोलिस प्रत्येक गुन्हे घडण्यापासून रोखू शकत नाहीत आणि अशा अचानक झालेल्या घटनांसाठी लोक पोलिसांकडे जायलाही वेळ भेटत नाहीत.

खरं तर लोकांचे रक्षण करण्याचा अधिकार राज्य व त्यातील संस्थांचा आहे, परंतु संकट उद्भवल्यास प्रत्येक व्यक्तीचे रक्षण करण्यासाठी राज्य उपस्थित राहू शकत नाही. प्रत्येकाने आपले आणि आपल्या कुटुंबाच्या सरंक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे.

आजकाल आपल्या मोठ्या प्रमाणात मुलींवर होणारे अत्याचार किवा लैंगिक शोषण पाहायला मिळते. तसेच बऱ्याच घटना वारंवार ऐकायला मिळतात. कडक कायदा केल्याशिवाय गुन्हेगारांची संख्या कमी होणार नाही हे ही खर.

कायदा आणि सुव्यवस्था आपण सामन्य माणसे बदलू शकत नाही त्यामुळे आपण स्वतःला अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सक्षम बनवले पाहिजे. कुटुंबातील मुलींना इतका सक्षम बनवल पाहिजे की त्या कोणत्याही कठीण परिस्थितीचा सामना करू शकतात.

आजकाल अनेक पालक आपल्या मुलींना कराटे, योगा, तसेच आत्मरक्षण सारख्या अनेक उपक्रमांना पाठवतात. आणि खर पाहिलं तर हीच काळाची गरज आहे. प्रत्येक मुलीने इतक निर्भय झाल पाहिजे की ती स्वतःच रक्षण करू शकेल आणि समाजात घडणाऱ्या लैंगिक शोषणासारख्या गोष्टींना बळी पडणार नाही. आज आपण अश्याच एका मुलीचा व्हिडिओ पाहणार आहोत.

व्हिडिओमधील मुलगी अगदी कुशलतेचे तलवारबाजी करत आहे. ती समोर आलेल्या दुष्मनाला निश्चितच चीत करू शकते. या मुलीकडून खरच शिकण्यासारख आहे की इतक सक्षम व्हा की स्वतःच रक्षण स्वतः करू शकने. व्हिडिओ मधील मुलीची कला पाहून अनेकांनी तिचा प्रोत्साहन दिले आहे. तसेच मोठ्या संखेने तिचे कौतुक झालेलं पाहायला मिळतंय.

हे ही वाचा-

फेसबुकवर मैत्री झालेल्या मैत्रिणीला घरी कोणी नसताना बोलावले, नंतर घडला हा धक्कादायक प्रकार

या इलेक्ट्रिक कार्स एकदा चार्ज केल्यावर धावतात ४०० किलोमीटरपेक्षा जास्त, वाचा फीचर्स आणि किंमत

इंडिअन आयडल १२: सोनू कक्कडला शोची जज म्हणून पाहताच लोक भडकले, म्हणाले संपूर्ण कार्यक्रमातच गडबड

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.