मराठमोळा दिग्दर्शक सचिनवर भडकला; ‘माझ्यासाठी क्रिकेटचा देव होता पण…..’

भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पॉपस्टार रिहानाने पाठिंबा दिला होता. तिने आंदोलनासंबंधी बातमी शेअर करत ‘आपण यावर का बोलत नाही’ असा सवाल केला होता. या बातमीत तिने #FarmersProtest असा हॅशटॅग वापरला होता. शेतकऱ्यांसाठी बंद केलेली इंटरनेट सेवा, पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये होत असलेल्या संघर्षाचा यात उल्लेख केला होता.

रिहानाला उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाने #IndiaTogether, #IndiaAgainstPropaganda हे हॅशटॅग वापरले होते. त्यानंतर अनेक क्रिकेटपटूंनी #IndiaTogether, #IndiaAgainstPropaganda याच हॅशटॅगचा वापर करत ट्विट करत प्रत्युत्तर दिले होते.

माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांनीही याच हॅशटॅगचा वापर करून भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही. भारतात जे काही घडत आहे, बाह्य शक्ती त्याचे प्रेक्षक होऊ शकतात परंतु सहभागी होऊ शकत नाहीत. भारतीयांना भारत माहित आहे आणि त्यांनीच निर्णय घ्यावा, चला एक राष्ट्र म्हणून एकजूट उभे राहूया. असे ट्विट केले होते. त्याच्या या ट्विटनंतर देशातील अनेकांनी सचिनची ही भूमिका शेतकऱ्यांविरोधी असल्याचं म्हणतं त्याच्यावर टिका करण्यास सूरूवात केली.

धुरळा आणि आनंदी गोपाळ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक समीर विध्वंस यांनीही सचिनच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली. त्यात त्यांनी म्हटले की, “सचिनची बॅटिंग बघत लहानाचा मोठा झालो! तो माझ्यासाठी क्रिकेटचा देव होता! आयुष्याच्या अनेक निराशक्षणी मी त्याच्या इनिंग्ज बघायचो, खुप बरं वाटायचं. त्याच्या अनेक गोष्टी मनाला पटल्या नाहीत पण हे कधी बदललं नव्हतं. पण आता इथून पुढे सगळं वेगळं असेल. राग येतोच पण वाईट जास्त वाटतयं!” असं ट्विट समीर विध्वंस यांनी केलं आहे.

म्हत्त्वाच्या बातम्या-
बंद पडली होती कार, पठ्यानं अस देशी जुगाड केलं की आनंद महिंद्राही झाले फिदा; पाहा व्हिडीओ
‘नरेंद्र मोदींचा फोटो वापरून आमचे घर चालत नाही’; मोदींच्या भावाची मोदींवर टीका
‘शेतकरी आंदोलनातील २०० शेतकऱ्यांना अटक केली, पण…’
कंगना पुन्हा बरळली; भारतीय क्रिकेटर्संना म्हणाली धोबी का कुत्ता

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.