मराठी टेलिव्हिजनवर आत्तापर्यंत अनेक मालिका आल्या. पण त्यातल्या काही मालिकांनी खुप कमी वेळात प्रेक्षकांच्या घरात स्थान निर्माण केले. ते स्थार आजही कायम आहे. मालिकेला संपून अनेक वर्ष झाली तरी मालिकेतील कलाकारांना प्रेक्षक आजही विसरले नाही.
अशाच काही कलाकारांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. एकेकाळी टेलिव्हिजनवर राज्य करणाऱ्या अचानक फिल्म इंडस्ट्री सोडून गेल्या आहेत. त्या अभिनय क्षेत्रापासून लांब असल्या तरी त्यांचे चाहते आजही त्यांची आठवण काढत असतात.
१ कादंबरी कदम – मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीसाठी हे नाव नवीन नाही. मराठीतील प्रेक्षकांसाठी हे नाव खुप ओळखीचे आहे. तिने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करत एक वेगळी ओळख निर्माण केली होती. पण गेल्या काही वर्षांपासून ती अभिनय क्षेत्रापासून लांब आहे.
कांदबरीने अवघाचि संसार, अकल्पित, इंद्रधनूष्य, दिपस्तंभ अशा मालिकांमध्ये काम केले आहे. पण तिला खरी ओळख स्टार प्रवाहवरील ‘तुजविण सख्या रे’ मालिकेतून मिळाली. ही टेलिव्हिजनवरील सर्वात प्रसिद्ध मालिका आहे. या मालिकेने तिला घराघरात ओळख निर्माण करुन दिली होती.
मालिकांसोबतच तिने ही पोरगी कोणाची, पटलं तर घ्या, क्षणभर विश्रांती या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. २०१६ मध्ये तिने सिनेमॅटोग्राफर अविनाश अरुणसोबत लग्न केले. लग्नानंतर ती पुर्णपणे तिच्या संसारावर लक्ष देत आहे.
२ नेहा गद्रे – काही मराठी मालिका ह्या अजरामर आहेत. अशीच एक मालिका म्हणजे ‘मन उधाणं वाऱ्याचे’ या मालिकेची एक वेगळी ओळख आहे. मालिकसोबतच मालिकेत काम करणारे कलाकार देखील खुप जास्त गाजले होते. मुख्य भुमिका निभावणारी अभिनेत्री नेहा गद्रे देखील प्रसिद्ध झाली होती.
आजही तिचे लाखो चाहते आहेत. तिच्या सुंदरतेवर अनेक तरुण घायाळ आहेत. तिने साकारलेली गौरीची भुमिका खुपच गाजली होती. त्यानंतर तिने मोकळा श्वास आणि गडबड झाली या चित्रपटांमध्ये देखील काम केले. तिला खुप जास्त प्रसिद्ध मिळाली.
२०१८ मध्ये ती शेवटची एका चित्रपटामध्ये दिसली होती. त्यानंतर २०१९ मध्ये ईशान बापटसोबत लग्न केले. लग्नानंतर ती अभिनय क्षेत्रापासून लाबं गेली. आज ती तिच्या नवऱ्यासोबत ऑस्ट्रेलियात स्थायित झाली आहे. ती तिच्या संसारात सुखी आहे.
महत्वाच्या बातम्या –
‘सोनपरी’ फेम मृणाल कुलकर्णी आज जगत आहेत ‘असे’ आयुष्य; वाचून धक्का बसेल
साऊथची ‘ही’ अभिनेत्री रोहित शर्माच्या प्रेमात झाली आहे वेडी; म्हणाली मला रोहित शर्माबरोबर…
‘काय घडलं त्या रात्री’ मालिकेतील ‘हा’ अभिनेता आहे श्रुती मराठेचा पती
‘देवमाणूस’ मालिकेतील साधी भोळी डिंम्पी खऱ्या आयूष्यात कशी आहे बघा; तुमचा विश्वास बसणार नाही