Share

‘ही’ मराठी अभिनेत्री झळकणार साऊथच्या चित्रपटात, बऱ्याच काळानंतर करतेय कमबॅक

बराच काळ विश्रांती घेतल्यानंतर मराठमोळी अभिनेत्री पल्लवी सुभाष(Pallavi Subhash) चित्रपट क्षेत्रात परतणार आहे. नुकताच अभिनेत्री पल्लवी सुभाषच्या नवीन चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट तमिळ भाषेत आहे. या चित्रपटाची सध्या दक्षिणेतील राज्यांमध्ये जोरदार चर्चा होत आहे. अभिनेत्री पल्लवी सुभाषने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.(Marathi actress will be seen in South’s film)

अभिनेत्री पल्लवी सुभाषने मॉडेलिंग पासून आपल्या कला क्षेत्रातील प्रवासाला सुरवात केली. सुरवातीला अभिनेत्री पल्लवी सुभाषने काही नाटकांमध्ये भूमिका केल्या. त्यानंतर तिला व्यावसायिक जाहिराती मिळू लागल्या. जाहिराती करत असतानाच अभिनेत्री पल्लवी सुभाषला ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेची ऑफर आली.

अभिनेत्री पल्लवी सुभाषने साहेब बीबी आणि मी, तुम्हारी दिशा, कर्म अपना अपना, अधुरी एक कहाणी आणि कसम से या हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री पल्लवी सुभाषने साऊथमधील अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. तिने कन्नड आणि तामिळ भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्री पल्लवी सुभाषने साऊथमध्ये भूमिका केलेल्या चित्रपटांना प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली आहे.

अभिनेत्री पल्लवी सुभाषने ‘हॅपी जर्नी’ या चित्रपटातही महत्वाची भूमिका केली होती. याशिवाय ‘मिरांडा हाऊस’ या चित्रपटात अभिनेत्री पल्लवी सुभाषने भूमिका साकारली होती. या चित्रपटात अभिनेते मिलिंद गुणाजी आणि साईंकित कामत यांनी देखील काम केले होते. ‘मिरांडा हाऊस’ हा एक रहस्यमय चित्रपट होता.

यानंतर अभिनेत्री पल्लवी सुभाष चित्रपट क्षेत्रापासून दूर गेली होती. तिचे कोणतेही चित्रपट प्रदर्शित झाले नव्हते. आता तीन वर्षांनंतर अभिनेत्री पल्लवी सुभाष चित्रपट क्षेत्रात परतली आहे. एका तमिळ चित्रपटात अभिनेत्री पल्लवी सुभाषने प्रमुख भूमिका साकारली आहे. या तमिळ चित्रपटाचे नाव ‘सेकंड शो’ असे आहे.

या चित्रपटात अभिनेता अजमल अमीर, अभिनेत्री विद्या प्रदीप मुख्य भूमिकेत आहेत. हा ऍक्शन आणि थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट मागील वर्षीच प्रदर्शित होणार होता, पण काही कारणांमुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. आता लवकरच हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या :-
सोलर फ्रीजमुळे विजबिल झाले कमी, ८० टक्क्यांपर्यंत मिळतेय सबसिडी, महिन्याला १५ हजारांचा फायदा
२५ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर उद्यानाला बनवले नंदनवन, दरवर्षी मिळतात भरघोस बक्षिसं
अनिता भाभीचे बोल्ड फोटो पाहून चाहते घायाळ, म्हणाले- ‘मार डाला रे..’

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now