मानसी नाईक पाठोपाठ आणखी एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री अडकली लग्नबेडीत; पहा फोटो..

मुंबई | चित्रपट सृष्टीतील कलाकारांनी लग्नाचा धुमधडाका लावला आहे. या नववर्षाच्या पहिल्या महिन्यातच अभिनेत्री अभिज्ञा भावे, मानसी नाईक आणि आशुतोष कुलकर्णी या कलाकारांनी सात फेरे घेतले आहेत. त्यानंतर आता मराठी अभिनेत्री प्राजक्ता परब हीने अंकुश मरोदेसोबत लग्नगाठ बांधली आहे. प्राजक्ताने तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहते.

 

अंकुश मरोदेसोबत ९ जानेवारीला प्राजक्ताने लग्न केले आहे. तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लग्नातील फोटोंना चाहते भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत.

फोटो शेअर करताना तिने लिहले ‘माझ्या नवऱ्याची बायको’ प्राजक्ताने मेहेंदी, हळदी आणि लग्न समारंभातील अनेक फोटो शेअर केले आहेत.

आभिनेत्री प्राजक्ताने ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण, ललित २०५, या मालिकेत काम केले आहे. तसेच माझ्या मित्राची गर्लफ्रेंड वेबसीरिजमध्ये झळकली आहे.

या जोडीनंतर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कुणाल बेनोडेकरसोबत लग्न करणार आहे. तसेच अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर हे दोघेही लग्न करणार आहेत. त्यामुळे या पुढेही मराठी कलाकारांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांना पाहायला मिळणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-
अभिनेत्री मानसी नाईक अडकली लग्नबंधनात; लग्नाचे फोटो झाले व्हायरल
रियल नायक! २४ जानेवारीला फक्त एक दिवसासाठी ‘ही’ मुलगी होणार राज्याची मुख्यमंत्री
अरे कुठं फेडताल ही पापं! हत्तीच्या अंगावर फेकला पेटता टायर; तडफडून हत्तीचा मृत्यू, पहा व्हिडिओ
‘मानाचा मुजरा’चे १० लाख भरा; अलका कुबल, प्रिया बेर्डे, विजय पाटकरांसह ११ जणांना दणका

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.