मराठी पाऊल पडते पुढे! ५ महिन्याच्या तिरा कामतसाठी ‘हा’ मराठी अभिनेता सरसावला

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एका चिमुकलीचा फोटो व्हायरल झाला होता तिचे नाव होते तिरा कामत. या चिमुकलीला एका इंजेक्शनची गरज होती आणि ते इंजेक्शन खूप महाग होते. पण आता तिच्या इंजेक्शनचा मार्ग आता मोकळा झाला होता.

या मुलीला एसएमए टाइप १ हा आजार झाला होता. त्या इंजेक्शनसाठी एका मराठी अभिनेत्याने खूप मेहनत घेतली आहे पण हे जास्त लोकांनां माहीत नाही. हे इंजेक्शन भारतात तयार होत नाही त्यासाठी ते अमेरिकेतून आणायचे होते.

या इंजेक्शनची किंमत १६ कोटी रुपये इतकी होती. सध्या तिच्यावर अंधेरीच्या पोर्टेबल व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. तिच्या रक्ताचा एक रिपोर्ट येणे बाकी आहे. पुढील २ ते ३ दिवसांत तिला इंजेक्शन मिळेल.

स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी हा दुर्मिळ आजार आहे. आपल्या मुलीला हा आजार झाल्याचे कळल्यानंतर तिच्या आई वडिलांनी तिला वाचवण्यासाठी धडपड सुरू केली. तिचे वडील एका आयटी कंपनीत काम करतात.

तर तिची आई फ्रिलांस इलेस्ट्रेटर म्हणून काम करते. पैसे जमवण्यासाठी त्यांनी क्राऊड फंडिंगचा आधार घेतला. यातून त्यांनी १६ कोटी रुपये जमवले. पण अडचण होती ती सीमा शुल्क भरण्याची. ते इंजेक्शन बाहेरून मागवण्यासाठी २ ते ५ कोटी सीमा शुल्क लागणार होते.

हा कर माफ व्हावा यासाठी अभिनेते निलेश दिवेकर यांनी खूप मेहनत घेतली. त्यांनी राज्य सरकारकडे यासाठी सतत पाठपुरावा केला होता. निलेश म्हणाले की, जेव्हा मला तिराबद्दल कळले होते तेव्हा मी तिच्या कुटुंबियांना संपर्क साधला होता.

त्यांच्याकडे तात्पुरते पैसे जमा झाले होते. पण त्यांच्याकडे इंजेक्शनवर लागणाऱ्या कस्टम ड्युटीची जीएसटीचा प्रश्न उभा राहिला होता. यामुळे इंजेक्शनची किंमत वाढणार होती. मी ही गोष्ट शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांच्या कानावर घातली.

यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबद्दल सांगितले. त्यांनी आरोग्य विभागाला या प्रकरणात लक्ष देण्याचे आदेश दिले. आरोग्य विभागाने जलद गतीने काम करत तिच्या इंजेक्शनवरील कर माफ केला. दरम्यान औषध येण्यासाठी अजून १५ दिवसांचा कालावधी बाकी आहे अशी माहिती मिळाली आहे.

महत्वाच्या बातम्या
शाब्बास रे पठ्ठया! थंडपेयाची चढ्या दराने विक्री करणाऱ्या हॉटेलला तरूणाने घडवली अद्दल
बाहुबली प्रभासला लॉकडाऊनचा जबर फटका, कंपनीवर आहे १००० कोटींचे कर्ज
नातीसाठी कायपण! ७४ वर्षांचे आजोबा नातीच्या शिक्षणासाठी दिवसरात्र चालवताहेत रिक्षा
तेरी मेरी यारी! विहिरीत पडलेल्या बैलाला वाचवण्यासाठी शेतकऱ्याने लावली प्राणाची बाजी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.