नुकतंच एका मराठी अभिनेत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ‘सोन्याची पावलं’ या मालिकेत दुष्यंतराव इनामदार या पात्राची भूमिका करणाऱ्या अभिनेता(Actor) आदित्य दुर्वे याच्या आईचे निधन झालं आहे. आईच्या निधनानंतर अभिनेता आदित्य दुर्वेने सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. “मम्मी मला खूप काही बोलावंसं वाटतंय पण आता काही बोलता यायना”, अशा शब्दांत अभिनेता आदित्य दुर्वेने भावना व्यक्त केल्या आहेत.(marathi actor share post on social media after mother died)
या पोस्टसोबत आदित्यने आईसोबतचा एक फोटो देखील शेअर केला आहे. या पोस्टमध्ये अभिनेता आदित्य दुर्वेने लिहिले आहे की, “मम्मी, मला खूप काही बोलावंसं वाटतंय पण आता काही बोलता यायना. तू मला फार लवकर सोडून गेलीस. मी तुला कधी सांगितलं नाही, परंतु तुझा हा अभिनेता मुलगा तुझ्यावर खूप प्रेम करतो. भावपूर्ण श्रद्धांजली आई.”
“मला माहित आहे की तू माझ्यासोबत कायम राहणार आहेस”, अशा आशयाची पोस्ट अभिनेता आदित्य दुर्वेने सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टवर अनेक मराठी कलाकारांनी कमेंट करत श्रद्धांजली वाहिली आहे. मराठी अभिनेता आदित्य दुर्वेने कलाक्षेत्रातील आपल्या करियरची सुरवात मॉडेलिंगपासून केली आहे.
लाइफ ओके वाहिनीवरील ‘कॉमेडी क्लासेस’ या हिंदी मालिकेत अभिनेता आदित्य दुर्वेने काम केले होते. त्यानंतर झी मराठीवरील ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या गाजलेल्या मालिकेत अभिनेता आदित्य दुर्वेने अभिनय केला होता. तसेच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मंडळ भारी’ या मालिकेत देखील त्याने काम केले होते.
सध्या अभिनेता आदित्य दुर्वेने कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सोन्याची पावलं’ या मालिकेत दुष्यंतराव इनामदारची भूमिका साकारली आहे. दुष्यंतराव इनामदार या पात्राला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत आहे. त्यामुळे ‘सोन्याची पावलं’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. या मालिकेमुळे अभिनेता आदित्य दुर्वे महाराष्ट्रातील घराघरांत पोहचला आहे.
महत्वाच्या बातम्या :-
… तर भारताची अवस्था श्रीलंकेसारखी होईल, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोदींना दिला धोक्याचा इशारा
इम्रान खानची गच्छंती अटळ, विरोधकांनी लावली फिल्डिंग, पाकिस्तानी सचिवालयाकडून अधिसूचना जारी
ताजमहाल नाही तर श्रीरामाने बांधलेला सेतू प्रेमाचे प्रतीक आहे; त्याचा अभिमान बाळगा- बड्या गायकाने मांडलं मत