मराठी कलाकार हिंदी चित्रपटांमध्ये नोकराच्या भूमिका का करतात? प्रिया बेर्डेंनी सांगीतले खरे कारण..

मुंबई । लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची एक पोस्ट व्हायरल होत आहे. यामुळे त्या आता चर्चेत आल्या आहेत. त्या म्हणतात, सध्या जे सगळ्या बाजूंनी वातावरण तापले ते नक्की आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे? सतत सगळे एकमेकांना शाब्दिक थोबडवत आहेत. सतत आम्ही किती हुशार तुम्ही किती मूर्ख, हे सांगितले जाते.

मीडियाची जी काही धाव पळ, धक्का बुक्की, ढकलाढकली चालू असते ते वेगळंच. यात आमच्या मराठी चित्रपट सृष्टीतल्या काही लोकांनी आपले मत व्यक्त केले, विरोध दर्शवला की आता त्यांच्या मागे लागलेत यांना कोण विचारतो , हिंदी मध्ये नोकराची, मित्राची कामे करणारे नटनट्या, नवीन स्कुटरचे फोटो टाकणारे, किंवा इथे अत्याचार झाले तेव्हा कुठे होते.

आम्ही खूप सामान्य कलाकार आहोत, तुम्हा प्रेक्षकांना मायबाप मानणारे आम्ही कलाकार आहोत. हे मराठी कलाकारांवर पूर्वापार झालेले संस्कार आहेत. हो आम्ही केलीत नोकराची आणि मित्रांची कामे हिंदीत, पण आमच्या समोर भल्याभल्या हिंदी हिरोची अभिनय करताना हातभर फाटलीय, नोकर न मित्रानं सारख्या नगण्य भूमिका आपल्या मराठी नटांनी सरस करून ठेवल्यात.

मित्रांनो तुम्हाला असे वाटते का की प्रत्येक कलाकार श्रीमंत असतो? पण असे काही नाही. इथे नशिबाचा भाग पण खूप जास्त आहे, खूप असुरक्षित वातावरण असत इथे, बॉलिवूड सारखे आमचे बजेट नसते कारण आमच्या पिक्चर ना थिएटर मिळत नाहीत, ज्यांच्याकडे काम आहे त्यांच्याकडे आहे.

अनेकजण कित्येक महिने घरात बसून दिवस काढत आहेत. अश्या वेळी आपलेच मायबाप प्रेक्षक अत्यंत घाणेरड्या पध्दतीने जर बोलायला लागले तर काय करायचे? कुणी येणार आहे का आमची घरं चालवायला? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

तुम्ही टीव्ही वर आमचेच चित्रपट, सिरियल्स बघून स्वतःचे मनोरंजन करत होतात, आमचे क्षेत्र नसते तर विचार करा या कठीण काळात काय केले असत तुम्ही? आम्ही तुम्हाला मायबाप समजतो तर तशी जाणीव तुम्ही ठेवा ही नम्र विनंती. असे त्यांनी म्हटले होते.

काही दिवसांपूर्वी कंगना राणावत हिच्या अनधिकृत असलेल्या ऑफिसवर बीएमसिने कारवाई केली होती. यानंतर मराठी सृष्टीतील अनेक कलाकारांनी समर्थन दर्शवले तर कोणी विरोधही केला. त्यांच्या या गोष्टीवरून त्यांना ट्रोलही केले गेले. अशातच प्रिया बेर्डे यांनीही आपले मत व्यक्त केले होते.

ताज्या बातम्या

त्यावेळी अमिताभ बच्चनसाठी अंडरवर्ल्ड डॉनच्या दारी गेल्या होत्या जया बच्चन

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर बंडातात्यांनी केले असे काही, पोलीसही भारावले, जाणून घ्या..

चालू रेल्वेत वृद्धाने केला उतरण्याचा प्रयत्न अन् पुढे…; पहा थरारक व्हिडिओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.