Homeइतरमराठी अभिनेत्याला काढले मालिकेतून बाहेर; राजकीय भूमिका घेणे पडले महागात...

मराठी अभिनेत्याला काढले मालिकेतून बाहेर; राजकीय भूमिका घेणे पडले महागात…

‘मुलगी झाली हो’ या स्टार प्रवाह चॅनलवरील मराठी मालिकेला सध्या प्रचंड प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या मालिकेत विलास पाटील ही भूमिका साकारणारे किरण माने सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत आहेत. चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, त्यांनी मोदी भक्तांविरोधात वेळोवेळी केलेली पोस्ट. आता त्यांनी घेतलेली राजकीय भूमिका त्यांना चांगलीच महागात पडलेली आहे.

किरण माने कित्येक दिवसांपासून विविध विषयांवर पोस्ट करत आहेत. त्यांनी पोस्ट करून मोदींवर आणि मोदी भक्तांवर निशाणा साधला आहे. त्यांच्या या पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. ते स्वतःची राजकीय भूमिका सोशल मीडियावर मांडत आले, मात्र आता त्यांना अशा प्रकारे राजकीय भूमिका घेऊन मोदी भक्तांच्या विरोधात पोस्ट करणं महागात पडले आहे. त्यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून काढून टाकण्यात आलं आहे.

नरेंद्र मोदी यांना सुरक्षिततेच्या कारणावरून पंजाब दौरा रद्द करावा लागला, तेव्हापासून राजकीय पक्षांमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच कलाकार,अभिनेता किरण माने यांनी देखील आपले राजकीय विचार फेसबुक च्या माध्यमातून लोकांसमोर मांडले. त्यांनी पोस्ट करून मोदींवर निशाणा साधला. त्यानंतरच्या दिवसापासून सोशल मीडियावर ते अधिक चर्चेत आले.

अनेक मोदी भक्तांनी देखील त्यांना ट्रोल केले. दरम्यान वेळोवेळी मोदी भक्तांच्या प्रतिक्रियांना किरण माने यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांनी वेळोवेळी या संदर्भातील पोस्ट टाकत मोदी समर्थकांना उत्तर दिले आहे. त्यांच्या याच राजकीय भूमिकेमुळे त्यांना मालिकेमधून काढण्यात आले,असे किरण माने यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले आहे.

त्यानंतर किरण यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, ‘ काट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा… गाड़ दो, बीज हूँ मैं, पेड़ बन ही जाऊंगा !’ किरण माने यांच्या अनेक चाहत्यांनी आयस्टँड व्हिथ किरण माने असा हॅशटॅग वापरून किरण माने यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत.

यावर किरण माने यांच्या समर्थनार्थ काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट केले आहे. किरण माने यांच्यासोबत होणाऱ्या गोष्टींचा त्यांनी निषेध नोंदवला आहे. त्यांनी ट्विट केले की, ‘किरण माने या गुणी कलाकाराने सद्य राजकीय परिस्थितीबद्दल मत व्यक्त केले ते भाजपला सहन झाले नाही त्यामुळे दबाव आणून या कलाकाराला मालिकेतून काढले गेले. हा भाजपाचा सांस्कृतिक दहशतवाद आहे. भाजप विरोधात बोलण्याची हिंमत कशी होते हा दंभ त्यामागे आहे.’ त्यामुळे आता पुढे किरण माने यांच्यासोबत न्याय होणार का पाहावे लागेल.

महत्वाच्या बातम्या
“मराठी पाट्यांच्या निर्णयामुळे व्यापाऱ्यांचे वाटोळे होणार, त्यामुळे निर्णय रद्द करावा, अन्यथा…”
रिलीज व्हायच्या आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला अजय देवगणचा १०० कोटींचा दृश्यम, वाचा काय घडले..
अल्लू अर्जुनच्या पुष्पाने तोडले सगळे रेकॉर्ड, जगभरात केली तब्बल एवढ्या कोटींची कमाई