…ही गोष्ट केली तर राज्य सरकारही तुमच्या समोर झुकेल; मराठी अभिनेत्याचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

एसटी कामगारांच्या आंदोलनामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. लवकरात लवकर एसटी महामंडळाचे शासनात विलिणीकरण करावे अशी मागणी कामगारांकडून केली जात आहे. याच मुद्यावरुन विरोधी पक्षनेतेही राज्य सरकारवर निशाणा साधताना दिसत आहे.

एसटी कामगारांच्या मागण्या पुर्ण करा नाहीतर हे आंदोलन थांबणार नाही, असे भाजप नेते म्हणताना दिसून येत आहे. याच पार्श्वभुमीवर मराठी अभिनेता किरण माने याने फेसबूकवर एक पोस्ट केली आहे. त्याने एसटी कामगारांना पाठिंबा दर्शवला आहे. पण यामध्ये कोणत्याही पक्षाची मदत घेऊ नये, असे आवाहन केले आहे.

जे लोकं शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हणत होते, अतिरेकी म्हणत होते, त्याच लोकांना आज तुमचा पुळका आलाय. पण हेच लोक सत्तेत असते तर तुम्हाला पण अतिरेकी म्हणायला कमी केलं नसतं. एसटीची काय गरज आहे, बंद करुन टाका कायमची, असे ते म्हटले असते, असे किरण मानेने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आता बुच बसलंय म्हणून तुमची बाजू घेताय. पण ती सत्तेसाठी हापापलेली विषारी सापाची पिल्लं आहे. त्यांना तुमच्या आंदोलनाचा फायदा घेऊ देऊ नका. तुम्ही पण बळीराजासारखं स्वत:च्या हिंमतीवर लढा. मग पहा संपुर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठिशी उभा राहतो की नाही.

https://www.facebook.com/kiran.mane.9047

तुम्ही शेतकऱ्यांचा आदर्श घ्या. बळीराजा लई हुशार आहे. त्याने एकाही पक्षाच्या नेत्याला आपल्या आंदोलनात सहभागी होऊ नाही दिले. त्यांनी एका पण पक्षाला मध्यस्थी करु दिले नाही. त्यांनी स्वत:च्या जीवावर पुर्ण लढाई जिंकली म्हणून ते यशस्वी झाले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आंदोलन केलं तेव्हा राज्य सरकार नाही झुकलं नाव बदलून ठेवीन, असेही किरण मानेने म्हटले आहे.

माझ्यासारख्या मराठी मातीतल्या कलावंतांना लालपरीने खुप साथ दिली आहे. मी तिच्याशी गद्दारी नाही करणार. तुम्ही कृष्णेच्या पाण्याइतके निर्मळ आहात. स्वबळावर लढा. जिथं केंद्र सरकार झुकलं, मग राज्य सरकार काय आहे. फक्त राजकीय पक्ष तांदळातल्या दगडासारखे बाजूला ठेवा. गरज नाहीये अशा घातकी लोकांची. माझाचं नाहीतर प्रत्येक संवेदनशील लोकांचा तुम्हाला पाठिंबा आहे, असे किरण मानेने म्हटले आहे. त्याची पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

महत्वाच्या बातम्या-
विधान परिषदेचं तिकीट कापल्यामुळे पंकजा मुंडेंनी सर्वांसमोर व्यक्त केली मनातील खदखद; म्हणाल्या…
जेव्हा भारताचे पंतप्रधान नवाझ शरीफांना म्हणाले होते तुम्हाला कश्मीर देतो पण ‘या’ अटीवर; वाचा किस्सा
पराभवाच्या भितीने भाजपने पळ काढला, एकनाथ खडसेंचा भाजपवर हल्लाबोल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.