Share

“काय गाडी काय ट्राफिक काय फोटो…ओक्केमधी हाय का नाय”, मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता कुशल बद्रिके पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अभिनेता(Actor) कुशल बद्रिकेची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या पोस्टची सध्या जोरदार चर्चा होत आहे. या पोस्टला अभिनेता कुशल बद्रिकेने भन्नाट कॅप्शन दिलं आहे. या कॅप्शनने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.(Marathi actor kushal badrike post viral)

अभिनेता कुशल बद्रिके सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह आहे. तो नेहमीच त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकताच अभिनेता कुशल बद्रिकेने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये अभिनेता कुशल बद्रिके, भाऊ कदम आणि दिग्दर्शक विजू माने कारमध्ये बसलेले दिसत आहेत.

हा फोटो अभिनेता कुशल बद्रिकेने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा फोटो शेअर करता असताना अभिनेता कुशल बद्रिकेने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “काय गाडी काय ट्राफिक काय फोटो…ओक्केमधी हाय का नाय.” या कॅप्शनचीच सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. या पोस्टला अभिनेता कुशल बद्रिकेने ‘3 idiots’ असा हॅशटॅग देखील दिला आहे.

अनेकांनी या पोस्टला लाईक केले आहे. अभिनेता कुशल बद्रिकेच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “तुम्ही तिघे एकत्र, सगळं ओक्केच हाय.” अभिनेता कुशल बद्रिकेचा ‘झोलझाल’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण चांगलचं तापलं आहे. यादरम्यान बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या ऑडिओ क्लिपमध्ये बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील गुवाहाटीमधील निसर्गाचे वर्णन केले होते. “काय ती झाडी, काय ते डोंगार, काय ती हॉटेल… सगळं ओक्केमध्ये हाय”, असे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील आपल्या समर्थकाला फोनवरुन सांगत होते.

या संवादाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील चर्चेत आले होते. या ऑडिओ क्लिपवर एक गाणं देखील प्रदर्शित करण्यात आलं होत. बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांच्या ऑडिओ क्लिपमधील संवादांवरती मीम्स देखील व्हायरल झाले होते.

महत्वाच्या बातम्या :-
मुख्यमंत्री होणारे फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याने राज ठाकरेंनी लिहिलं पत्र; म्हणाले, ही बढती आहे की…
”फडणवीसांना अपमानित करण्यासाठीच केंद्राने त्यांना मुख्यमंत्रिपद दिलं”
छातीतील गॅस आणि हार्ट अटॅकमधला फरक कसा ओळखावा? अनेक जण होतात कन्फ्युज, वाचा सोप्या भाषेत

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now