शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी ५१ आमदारांना सोबत घेऊन पक्षाविरोधात बंडखोरी केल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झालं आहे. या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. उद्धव ठाकरे(Uddhav Thakare) यांनी काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अनेकांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे.(marathi actor kiran mane post on uddhav thakre)
मराठी अभिनेते किरण माने यांनी उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेते किरण माने यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘ग्रेसफुल’ असा केला आहे. या पोस्टची सध्या जोरदार चर्चा होत आहे. या पोस्टसोबत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा कुटूंबासोबतचा एक फोटो देखील शेअर केला आहे.
अभिनेते किरण माने यांनी या पोस्टमध्ये लिहिले की, “उद्धवजी, एकच शब्द : ‘ग्रेसफुल! सत्यघटना सांगतो. सातार्याजवळ खिंडवाडी नांवाचं एक छोटं गांव आहे. तिथं एका मित्राकडं काल मी जेवायला गेलो होतो. एकतर गांव लै छोटं. त्यात गांवापास्नं लांब शेतात एकाकी असलेलं घर. गांवाकडची साधी मान्सं. राजकारणाशी-कुठल्या पक्षाशी काडीचाबी संबंध नाय. पोटापुरतं कमावणे आणि हातातोंडाशी गाठ घालणे यापलीकडं दुनियादारीशी संबंध नाय.”
https://www.facebook.com/1460418198/posts/pfbid02ofxk5BNenJ96tNUAVzq4zXf3QDsWjmrTpH3Adr13hpgpYccMU1FJUYQ1wXiWskasl/?d=n
” लै दिसातनं जमीनीवर मांडी ठोकून जेवायला बसलो, आन् ‘ती’ बातमी दिसली…कुनाचा विश्वास बसनार नाय, पन तुम्ही राजीनामा दिलात हे कळल्यावर, त्या घरातला एकेक मानूस हळहळला. च् च् च् च् असे आवाज आले. काहीजनांच्या डोळ्यांत पानी आलेलं मी काल माझ्या डोळ्यांनी बघितलं. घरातल्या तरन्या लोकांपास्नं म्हातार्यांपर्यन्त प्रत्येकाच्या तोंडात एकच वाक्य होतं ‘चांगला मानूस व्हता’!”, असे अभिनेते किरण माने यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.
अभिनेते किरण माने यांनी पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, “उद्धवजी, खरं सांगू? मला लै आनंद झाला. का ते नंतर सांगतो.. पन तुमच्या आयुष्यात जे घडलं, ते नविन नाय. राजकारनात तर ‘काॅमन’ गोष्ट हाय. खर्या आयुष्यात गरीब असो वा श्रीमंत… सामान्य मानूस असो वा सेलिब्रिटी..त्याच्या त्याच्या पातळीवर पराभवाचा सामना प्रत्येकाला करावा लागतो”, असे अभिनेते किरण माने यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.
“विश्वासघाताचं दु:खबी सगळ्यांना पचवावं लागतं. पन अशावेळी लै कमी लोक तुमच्यासारखे ‘धीरोदात्त’ असतात ! मी म्हनत नाय की तुमची चूक नसंलच. तुमच्याकडुन चुका झाल्याबी असतील. पन तरीबी जे घडलं ते ‘मानूस’ म्हनून उद्ध्वस्त करनारं होतं. तुम्ही आतनं ‘तुटला’ नसाल का हो? काळजाला घरं पडली नसतील का? जी मान्सं तुमच्या पक्षानं शून्यातनं वर आनली.. त्या मान्सांबरोबरचे सुरूवातीपासूनचे कित्येक आनंदा-दु:खाचे क्षण तुमच्या डोळ्यांसमोर तरळले नसतील का?”
महत्वाच्या बातम्या :-
तुमच्यामुळे राज्यात जातीय दंगली झाल्या नाहीत…, प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीकडून ठाकरेंचे कौतूक
सरकार कोसळल्यानंतर भाजपच्या जल्लोषावर बंडखोर संतापले, म्हणाले, ‘यामध्ये उद्धव ठाकरे कुठेही…’
आता उतायचं नाही, मातायचं नाही, फक्त..; पुन्हा सत्ता मिळाल्यावर फडणवीसांची प्रतिक्रीया