Share

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या ‘त्या’ पोस्टवर भडकला अभिनेता, म्हणाला, ‘…कुत्रबी ईचारत नाय’

Sonalee-Kulkarni.j

गेल्या काही दिवसांपासून मराठी अभिनेते किरण माने(Kiran Mane) प्रचंड चर्चेत आहेत. ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून बाहेर काढल्यानंतर अभिनेते किरण माने यांनी मालिकेच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले होते. ‘राजकीय पोस्ट केल्यामुळे मला मालिकेतून बाहेरचा रास्ता दाखवला गेला’ असा आरोप अभिनेते किरण माने यांनी केला होता.(marathi actor kiran mane comment on sonali kulkarni post)

त्यावेळी अभिनेते किरण माने खूप चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा किरण माने मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या(Sonali Kulkarni) पोस्टवर कमेंट केल्यानंतर चर्चेत आले आहेत. २७ फेब्रवारीला संपूर्ण महाराष्ट्रात ‘मराठी भाषा दिन’ साजरा करण्यात आला. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शुभेच्छा दिल्या होत्या.

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने देखील तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर मराठी भाषा दिनाची एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये सोनालीने लिहिलं होतं की, “न आणि ण.. श आणि ष.. ळ आणि ड, चांदणी मधील च आणि चंद्रामधील च, जहाजमधील ज आणि जीवनामधील ज यांच्या उच्चारातील फरक कळणाऱ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! बाकीच्यांना मराठी भाशा दिनाच्या मणापासून षुभेच्छा!!!” अशी ही पोस्ट होती.

अभिनेता किरण माने यांनी या पोस्टवरून अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला चांगलेच सुनावले आहे. सोनाली कुलकर्णीच्या या पोस्टवर कमेंट करताना अभिनेता किरण माने यांनी लिहिले की, “उच्चार चुकवणाऱ्यांनी ‘डॅन्स’ची एक लाखाची सुपारी दिली की पारावर आणि ट्रॉलीवरबी नाचायचं… आणि इकडं येऊन त्यांची टर उडवायची हे बरे न्हवं. अस्सल सातारीत बोलणार या कायम ण ला न म्हणनार .”

किरण माने यांनी या पोस्टच्या कमेंटमध्ये पुढे लिहिलं आहे की, या आमच्या लाडक्या राज्यांच्या वाढदिवसाला परवा परवाच साताऱ्यात नाचून गेल्यात म्याडम… या नट्यांना प्रमाणभाषेत बोलणारं कुत्रबी ईचारत नाय. सगळं यश मिळवलंय ते ग्रामीण भूमिका करूनच. लिष्ट काढा हिट्ट पिच्चरची”, अशी कमेंट अभिनेता किरण माने यांनी केली आहे.

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. अभिनेता किरण माने यांनी या पोस्टवर कमेंट केल्यानंतर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आलं. त्यानंतर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ही पोस्ट सोशल मीडियावरून डिलीट केली. पण तोपर्यंत या पोस्टचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

महत्वाच्या बातम्या :-
स्वस्तात दर्जेदार शिक्षण! वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनला जाण्याची गरज नाही, आनंद महिंद्रांनी घेतला मोठा निर्णय
..तर राजकारण सोडेन, नितीन गडकरींचे रोखठोक वक्तव्य
फॅन, कुलर, फ्रीज आताच खरेदी करा, महिन्याभरात इलेक्ट्रिक वस्तूंच्या किंमतीत होणार ‘एवढ्या’ टक्क्यांनी वाढ

 

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now