मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही; निलेश राणेंची संभाजीराजेंवर गंभीर टीका

मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात वादळ पेटले आहे. महाराष्ट्रामध्ये आरक्षण रद्द केल्याने एक संतापाची लाट उसळलेली आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

संभाजीराजे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने सगळीकडून त्यांच्यावर टीका व्हायला सुरुवात झाली आहे. नारायण राणे यांचे चिरंजीव आणि माजी खासदार निलेश राणे यांनी पण त्यांच्यावर टीका केली आहे.

निलेश राणे यांनी म्हटले आहे की, मराठा आरक्षणाचा विषय जसा वाटेल तसा हाताळायला मराठा समाजाने तूम्हाला ठेका दिलेला नाही. संभाजी राजे यांच्यावर कडवट भाषेत निलेश राणे यांनी टीका केली आहे.

गुरुवार दिनांक २७ मेला संभाजीराजे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. मराठा आरक्षण मुद्यावर ही भेट घेतली असल्याचे सांगण्यात आले. राजकीय वर्तुळात पण या भेटीचे तर्क वितर्क काढण्यात आले.

निलेश राणे यांनी म्हटले आहे की, संभाजीराजे यांच्या मनातं काहीतरी वेगळेच आहे. त्यांना महाविकास आघाडी आणि शरद पवार यांच्याबरोबर जायचे असेल तर त्यांनी खुशाल जावे. पण मराठा आरक्षणाचा विषय स्वतःसाठी वापरू नये.

मराठा आरक्षणाचा विषय स्वतःसाठी वापरायला समाजाने तुम्हाला ठेका दिला नाही असे निलेश राणे यांनी म्हटले आहे. मराठा समाजासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी मराठा आरक्षण प्रश्नासंदर्भात सर्व पक्षांनी एकत्र यावे असे सुचवले आहे.

ताज्या बातम्या
ऑस्ट्रेलियातील नोकरी सोडून सुरू केला महाराष्ट्रीयन जेवणाचा व्यवसाय, आज आहेत १४ रेस्टॉरंट्स

काय सांगता! २६ महिन्यांचा मुलगा विराट कोहली सारखा खेळतोय क्रिकेट, पाहा विडिओ

बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूरने खरेदी केला स्काय व्हिला, किंमत ऐकून बसेल धक्का..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.