Share

Maratha Reservation : वर्षभरात राज्यभर मराठ्यांना आरक्षण मिळणार, आचारसंहिता उठताच ‘या’ भागात हालचाली; जरांगेंची ग्वाही

Maratha Reservation : हैदराबाद गॅझेटच्या आधारे विदर्भ आणि मराठवाड्यात मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळू लागला असताना, उर्वरित राज्यासाठीची लढाईही निर्णायक टप्प्यात नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांनी आचारसंहिता संपताच पश्चिम महाराष्ट्रात ठोस हालचाली सुरू होतील, असे स्पष्ट केले. वर्षभरात संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊ, असा शब्द त्यांनी दिला.

सिन्नर तालुक्यातील पांगरी गाव (Pangari ) येथे छावा मराठा क्रांती मिशनच्या अधिवेशनात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजमाता जिजाऊ यांचे वंशज शिवाजीराजे जाधव (Shivajiraje Jadhav descendant) होते. व्यासपीठावर सामाजिक आणि ऐतिहासिक विचारांची सांगड घालत मराठा समाजाच्या भवितव्याबाबत स्पष्ट भूमिका मांडण्यात आली.

समाजासाठी त्याग गरजेचा, आरक्षणाला जातीवाद म्हणू नका

या वेळी बोलताना त्यांनी समाजातील अंतर्गत संघर्ष, जातीवादाचे आरोप आणि आरक्षणाच्या लढ्याला होणारा विरोध यावर स्पष्ट शब्दांत भूमिका मांडली. समाजासाठी त्याग केल्याशिवाय पुढची पिढी सक्षम होणार नाही, असे सांगत गरीबांच्या लेकरांना आरक्षण मागताना त्याला जातीवाद ठरवू नये, असा इशारा देण्यात आला. आंदोलन फोडण्यासाठी काही लोक जातीवादाचा मुद्दा पुढे करत असल्याचा आरोपही करण्यात आला.

आरक्षणासाठीच्या संघर्षात अनेक प्रलोभने आणि धमक्या मिळाल्या, मात्र आपण कधीही डगमगलो नाही, असा पुनरुच्चार करत ही लढाई प्रामाणिकपणे आणि जिद्दीने सुरूच राहील, असे सांगण्यात आले. साधू-संतांनी समाजप्रबोधनासाठी पुढे यावे, असे आवाहनही करण्यात आले.

माजलगावमध्ये ऊसतोड मजुरांच्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; दोघांना अटक

दरम्यान, जिल्ह्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. माजलगाव तालुका (Majalgaon taluka Beed) येथे आदिवासी समाजातील ऊसतोड मजुरांच्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गावातील किराणा दुकानदार आणि ट्रॅक्टर चालकाने शेतात नेऊन हा गुन्हा केल्याचा आरोप असून, ग्रामीण पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे.

छत्तीसगड येथून आलेल्या ऊसतोड मजुरांची टोळी मागील दोन महिन्यांपासून रोशनपुरी परिसरात काम करत होती. मजुरांसोबत आलेल्या मुलींवर झालेल्या या अत्याचारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, पीडितांना न्याय मिळावा अशी मागणी होत आहे.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now