Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा लढा उभारण्यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईत आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनात लाखो मराठा समाजबांधव सहभागी झाले. सरकारकडून हैदराबाद गॅझेटवरील जीआर काढून दिलासा जरी मिळाला, तरी या संघर्षात पाच आंदोलकांनी प्राण गमावले. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर अंधार कोसळला. अशा गंभीर प्रसंगात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnai) हे पुढे सरसावले.
सरनाईक यांनी या हुतात्मा आंदोलकांच्या कुटुंबीयांना स्वतःच्या खर्चातून एकूण पंचवीस लाखांची मदत दिली. प्रत्येक कुटुंबाला पाच लाखांचा धनादेश देण्यात आला. धाराशिव (Dharashiv) येथे या मदतीचे वाटप झाले. मदत मिळाल्यानंतर हुतात्म्यांच्या कुटुंबीयांनी भावनिक अश्रू ढाळत सरनाईक यांचे आभार मानले.
मदत मिळालेल्या हुतात्म्यांची माहिती
-
सतीश देशमुख (Satish Deshmukh) – गाव: वरपगाव, ता. केज, जि. बीड
-
विजय चंद्रकांत घोगरे (Vijay Ghogare) – गाव: टाकळगाव, ता. अहमदपूर, जि. लातूर
-
अतुल खवचट (Atul Khavchat) – गाव: केसापुरी, ता. बीड, जि. बीड
-
गोपीनाथ जाधव (Gopinath Jadhav) – गाव: बोराळा, ता. वसमत, जि. हिंगोली
-
भारत यादव खरसाडे (Bharat Kharsade) – गाव: आहेर वडगाव, ता. बीड, जि. बीड
सरनाईक यांनी दिलेली ही मदत फक्त आर्थिक स्वरूपाची नसून, ती हुतात्मा कुटुंबांना आधार देणारी आहे. “या लढ्यात आपले प्रियजन गमावलेले कुटुंबीय एकटे नाहीत” हा संदेश या मदतीतून समाजाला देण्यात आला आहे.






