सुप्रिम कोर्ट म्हणाले मराठा आरक्षण अल्ट्रा व्हायरस आहे- ऍड. गुणरत्न सदावर्ते

संपुर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणाबद्दल सुप्रिम कोर्टाने आज निकाल जाहीर झाला आहे. यावेळी मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय कोर्टाने घेतला आहे. त्यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अनेक मोठ्या व्यक्तींनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहे. आता सुप्रिम कोर्टाच्या या निकालाचे ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी स्वागत केले आहे. तसेच भारतीय संविधान आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने गुणवतांना न्याय दिला आहे, असे सदावर्ते यांनी म्हटले आहे.

यावेळी गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाची तुलना व्हायरसशी केली आहे. सर्वोच्च न्यायलयाने मराठा आरक्षण हा अल्ट्रा व्हायरस आहे असे म्हटल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच या प्रकरणात इंदिरा साहनी खटल्याच्या अनुषंगाने फेर विचार करण्याचीही गरज नाही, असेही न्यायालनाने म्हटल्याचे सदावर्ते यांनी म्हटले आहे.

तसेच मराठा आरक्षण रद्द झाल्यावर खासदार संभाजीराजे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवण्यासाठी फडणवीस सरकारप्रमाणेच ठाकरे सरकारनेही सर्वोतोपरी प्रयत्न केले आहे. त्यामुळे कोणालाही दोष देण्यात अर्थ नाही, असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णायाचा मी आदर करतो. परंतू आजचा दिवस हा मराठा समाजासाठी दुर्देवी आहे, असेही संभाजीराजे यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा निर्णय रद्द केल्यानंतर संभाजीराजे यांनी कोल्हापुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता, त्यावेळी ते बोलत होते.

तसेच सध्या मराठा समाजाला संयम बाळगण्याची गरज आहे. सध्याची कोरोना स्थिती भयानक आहे. अशा परिस्थितीत मराठा समाजाचा उद्रेक होणे योग्य ठरणार नाही. आरक्षण घेण्यासाठी आधी आपण जीवंत राहिले पाहिजे. त्यामुळे अशा परिस्थितीत मराठा समाजाने कोणीतेही टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘आई कुठ काय करते’ मालिकेतील यश खऱ्या आयुष्यात आहे विवाहित, पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय घेणार घटस्फोट? अभिषेकने केला ‘हा’ मोठा खुलासा
पंतप्रधान कार्यालय कामाचे नाही, कोरोना लढ्याचे नेतृत्व गडकरींकडे द्या; भाजपा खासदाराची मागणी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.