मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणावरून जोरदार राजकारण पेटले आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. तसेच मराठा समाजाला स्थगिती दिल्यापासून विरोधक ठाकरे सरकारला लक्ष करत आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘उद्धव ठाकरे हे मराठाद्वेषी आहेत. ते जोपर्यंत मुख्यमंत्री आहेत तोवर मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही,’ असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण हे राज्य सरकारसाठी प्राधान्याचे मुद्दे नाहीत. त्यामुळे हे सरकार घालवल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, असे राणे यांनी म्हटंले आहे. गुरुवारी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारासाठी हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथील सभेत ते बोलत होते.
मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा…
काही दिवसांपुर्वी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला होता. ‘सरकारने मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा करून मराठा तरुणांचा विश्वासघात केला आहे. त्यांचा हा पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार त्यांना निश्चितच महागात पडणार असल्याचे पाटील म्हणाले.
तसेच आता तरी सत्तेचा माज सोडून मराठा तरूणांच्या भविष्याचा विचार करा. अन्यथा मराठा रस्त्यावर उतरला की इतिहास घडतो, हे देशाने पाहिलं आहे, असे पाटील म्हणले होते.
महत्त्वाच्या बातम्या
सज्ञान मुलीला कोणासोबतही आणि कुठेही राहण्याचा अधिकार, पालकही तिला रोखू शकत नाही
पुणेकरांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार; पहा काय आहे ही गुड न्युज
बॉस असावा तर असा! कर्मचार्यांना बनवले करोडपती, जाणून घ्या..