मोठी बातमी! मराठा आरक्षण रद्द, सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय

नवी दिल्ली । सर्वांचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणाचा कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द केला आहे. मराठा आरक्षण रद्द करतोय, असे स्पष्ट मत कोर्टाने दिले आहे. अशी माहिती याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली आहे. अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता.

यानंतर कोर्टाचा हा निर्णय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया विनोद पाटील यांनी व्यक्त केली आहे. कोर्टाच्या या दुर्दैवी निर्णयामुळे स्थगित असलेले आरक्षण थांबलेले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

मराठा समाजाने शांततेत मोठे मोर्चे काढले होते. यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळणार हा याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महाराष्ट्राने संवैधानिक प्रक्रिया पूर्ण करून विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मराठा आरक्षण कायदा पारित केला होता.

सर्वोच्च न्यायालयात १०२ वी घटनादुरूस्ती आणि ५० टक्के मर्यादा या दोन्ही मुद्यांवर राज्य सरकार व आरक्षण समर्थक खासगी याचिकाकर्त्यांकडून युक्तिवाद झाला. गेल्या काही दिवसांपासून या निर्णयासाठी अनेकदा तारीख देण्यात आली होती.

आज सकाळी १०.३० वाजता सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने गायकवाड समितीची अहवाल अस्वीकारार्ह असल्याचे म्हटले आहे. मराठा आरक्षण देणे गरजेचे वाटत नसून सध्याच्या परिस्थितीत आरक्षण देणे शक्य नसल्याचे सांगितले.

यामुळे आता मराठा समाज काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खासदार संभाजीराजे यांनी कोरोना काळात सर्वांनी संयम राखण्याचे आवाहन केले आहे.

ताज्या बातम्या

कॉमेडी क्विन भारती सिंहचा ‘हा’ व्हिडिओ पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

मराठी सिनेमासृष्टीवर कोरोनाचा वार; ‘या’ दोन प्रसिद्ध अभिनेत्यांचे निधन

अभिमानास्पद! रिक्षा चालकाच्या मुलाची गरुडझेप, इस्रोमध्ये सायंटिस्ट पदासाठी निवड

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.