साताऱ्यात राडा! मराठा आंदोलकांनी मंत्र्याच्या घरावर फेकले शेण, काँग्रेस राष्ट्रवादीच्या, कार्यालयावर दगडफेक

सातारा । मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने नुकताच निकाल जाहीर केला. यामध्ये हे आरक्षण रद्द करण्याचे आदेश कोर्टाने दिले. यामुळे आता मराठा समाज आक्रमक झाला आहे. या निर्णयामुळे राज्यातील मराठा समाजात मोठी संतापाची लाट पसरली आहे.

याचे पडसाद साताऱ्यात उमटले, या निर्णयाविरोधात काही अज्ञातांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस कार्यालयावर दगडफेक केली आहे. तसेच गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांच्या साताऱ्याच्या निवासस्थानाबाहेर कोणीतरी शेणाच्या गोवऱ्या फेकल्या असून पोलीस याचा तपास करत आहेत.

अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणावर निकालाची तारीख दिली जात होती. अखेर याचा निकाल देण्यात आला. यामुळे मराठा समाज नाराज झाला असून आता पून्हा एकदा आंदोलन पेटण्याची शक्यता आहे.

यामुळे साताऱ्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीसह काँग्रेस सातारा जिल्हा कार्यालयावर दगडफेक केली. यावेळी सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या. यामुळे पूढे देखील हे आंदोलन पेलण्याची शक्यता आहे.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील निवासस्थाने देखील अज्ञातांनी शेण फेकले. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलिस फोर्स दाखल झाले. राज्यात आता मोठे मोर्चे निघण्याची शक्यता आहे.

खासदार संभाजीराजे यांनी शांतता ठेवण्याचे आवाहन केले आहे. कोरोना असल्याने त्यांनी समाजाला आवाहन केले आहे. मात्र मराठा समाजाने पुन्हा एकदा आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे.

ताज्या बातम्या

भारतासारख्या देशाला लसनिर्मितीचा फॉर्म्युला देऊ नये; बिल गेट्स यांचे वादग्रस्त वक्तव्य

आजोबा लॉर्ड माउंटबॅटनचे आणि वडील जवाहरलाल नेहरूंचे केस कापायचे, वाचा जावेद हबीबची यशोगाथा

मुलीच्या डोक्यातील कोंडा घालवण्यासाठी केला घरगुती उपाय, आता त्याच्यातूनच कमावतेय करोडो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.