मराठा आरक्षणाचा एल्गार! संभाजीराजेंच्या नेतृत्वात कोल्हापूरात पहीला मोर्चा; प्रकाश आंबेडकरही सहभागी

कोल्हापूर । गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा विषय राज्यात केंद्रस्थानी आहे. खासदार संभाजीराजे यांनी राज्यभर दौरे करून कोल्हापूरमधून आंदोलनाला सुरुवात करणार असल्याची घोषणा ६ जूनला रायगडावरून केली होती. यामुळे या आंदोलनात कोण सहभागी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

संभाजीराजे यांच्या नेतृ्त्वात आज मराठा आरक्षणासाठी मराठा मूक मोर्चा आयोजित केला आहे. महाराष्ट्रातील हा पहिला मराठा मोर्चा आहे. संभाजीराजेंच्या आवाहनाला वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिसाद दिला आहे.
मराठा मोर्चात प्रकाश आंबेडकरही सहभागी होणार आहेत.

संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. संभाजीराजे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. त्यावेळी बऱ्याच दिवसांपासून प्रकाश आंबेडकर यांची भेट घ्यायची होती. मला शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे.

शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर एकत्र येऊ शकतात, तर मी आणि प्रकाश आंबेडकर का एकत्र येऊ शकत नाहीत? हा भेटीमागचा हेतू होता, असे संभाजीराजे यांनी म्हटले होते. यामुळे ते देखील आंदोलनात सहभागी होणार का? यावर चर्चा सुरू झाली होती.

त्यानंतर आता प्रकाश आंबेडकर उद्या आंदोलनस्थळी येऊन मराठा आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय त्यामध्ये दोन मार्ग आहे. एक म्हणजे रिव्हूय पिटीशन आणि ती फेटाळल्यावर क्युरेटिव्ह हे दोन मार्ग आहेत.

राज्य सत्तेशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात शिळेपणा आला आहे. तो ताजेपणा आणायचा असेल, तर संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर तो येऊ शकतो, असे त्यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. यामुळे आता आरक्षणावर काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

ड्रग्ससोबत सुरू होते बर्थडे सेलिब्रेशन, ‘या’ अभिनेत्रीला अटक

पुण्यातील चिमुकल्या वेदीकाला आज दिले ’16 कोटींचे’ इंजेक्शन, कुटुंबीय आनंदाने गेले भारावून

VIDEO: बुटं कोणी चोरावे नाही म्हणून बुटांवरच बसला नवरदेव, पहा मग मेहूणींनी काय केलं

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.