भारतामधील लोकांना सिनेमाचं वेड फार आहे. १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटाचे आजही प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान आहे. हा चित्रपट लोकांमध्ये जिवंत ठेवण्यात मुंबईतील ‘मराठा मंदिर’(Maratha Mandir) या आयकॉनिक थिएटरचा मोठा वाटा आहे. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा चित्रपट 26 वर्षांहून अधिक काळापासून या चित्रपटगृहात सुरु आहे.(maratha mandir theater story viral)
आज आपण ‘मराठा मंदिर’ या चित्रपटगृहाबद्दल जाणून घेणार आहोत. ‘मराठा मंदिर’ हे चित्रपटगृह १६ ऑक्टोबर १९५८ रोजी प्रेक्षकांसाठी खुले करण्यात आले आहे. त्यावेळी या चित्रपटगृहात एक हजार प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्या काळातील अनेक मोठे चित्रपट ‘मराठा मंदिर’ मध्ये प्रदर्शित झाले होते.
मराठा मंदिरात प्रदर्शित झालेला चित्रपट नक्कीच सुपरहिट होणार, अशी त्या काळात चित्रपट निर्मात्यांची धारणा होती. या चित्रपटगृहात नेहमीच तिकीट दर अत्यंत कमी ठेवण्यात आले होते. त्यामुळे सर्व स्तरातील लोक मराठा मंदिर’ मध्ये चित्रपट पाहण्यासाठी येत असत. ज्या रस्त्यावर हे चित्रपटगृह आहे, त्या रस्त्याला ‘मराठा मंदिर मार्ग’ असे नाव देण्यात आले आहे.
१९९० च्या दशकात सिनेमांची तिकिटे खूप महाग असायची. त्या काळात ‘मराठा मंदिर’ चित्रपटगृहाने तिकिटे खूप स्वस्त ठेवली होती. त्यावेळी मराठा मंदिरात ८, १० आणि १२ रुपयांची तिकिटे असायची. त्यामुळे गरीब लोक देखील बाल्कनीत आरामात बसून चित्रपट पाहण्याचा आनंद लुटत असतं. त्या काळात मराठा मंदिर तरुणांचे आवडते डेटिंग स्पॉट बनले होते.
मराठा मंदिर चित्रपटगृहात डेटवर आलेल्या अनेक जोडप्यांनी नंतर लग्नगाठ बांधली. याबद्दल माहिती देताना चित्रपटगृहाचे व्यवस्थापक मनोज देसाई यांनी सांगितले की, “अनेक जोडपी लग्नानंतर, साखरपुड्यानंतर डीडीएलजे चित्रपट पाहण्यासाठी मराठा मंदिरात यायचे. आजही या चित्रपटाची इतकी क्रेझ आहे की सुट्टीच्या दिवशी DDLJ चा शो ७० टक्के प्रेक्षकांनी भरलेला असतो.”
‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटाच्या शो ला अनेकवेळा कामाठीपुरा येथील वेश्या उपस्थित असतात. यासंदर्भात बोलताना चित्रपटगृहाचे व्यवस्थापक मनोज देसाई यांनी सांगितले की, “त्यांचे आयुष्य खूप कठीण आहे. मनोरंजनासाठी त्या चित्रपट पाहण्यासाठी येतात. त्या अनेकदा माझ्याकडे येतात. मला नमस्कार करतात. त्यांना कोणताही त्रास होऊ नये. यासाठी आम्ही सेक्स वर्कर आणि ट्रान्सजेंडर्सनी कधीही मराठा मंदिरात रांगेत उभे करायचे नाही, असा नियम केला आहे.”
महत्वाच्या बातम्या :-
सपना चौधरी-वीर साहूचा टेरेसवरील रोमॅंटिक व्हिडीओ झाला व्हायरल, सोशल मिडीयावर खळबळ
मुझे क्या बोलना है? थीम क्या है? राहूल गांधी पुन्हा अडकले जाळ्यात; व्हिडीओ व्हायरल
VIDEO: ६ चेंडूत ९ धावा, मिलर अन् रशीद मैदानात; मुंबई इंडियन्सचा रोमांचकारक विजय