भारतीय सैन्यातील सर्वात जुनी इंन्फंट्री, वाचा मराठा लाईट इंन्फंट्रीचा इतिहास

आज आम्ही तुमच्यासाठी एक अनोखी कहाणी घेऊन आलो आहोत. ही कहाणी आहे भारतीय सैन्य दलातील सगळ्यात जुन्या इंन्फंट्रीची जिचे नाव आहे मराठा लाईट इंन्फंट्री. जो शत्रुंना मारेल पण स्वता कधीच मरणार नाही, ज्यांचे आदर्श आहेत छत्रपती शिवाजी महाराज, ती रेजिमेंट जिने पराभवाचा चेहरा कधीच बघितला नाही अशी आहे भारतीय सैन्याची मराठा लाईट इन्फट्री.

अशी म्हण आहे की मराठा गडी यशाचा धनी ही म्हण या इंन्फंट्रीवर तंतोतंत लागू पडते. ऑगस्ट १७६८ मध्ये मराठा एलआयची स्थापना झाली होती. स्थापनेच्या २० वर्षांपर्यंत युद्ध परिस्थितीतसुद्धा तयार होती मराठा लाईट इंन्फट्री.

त्यानंतर जंगी पलटण म्हणून त्यांना नवीन ओळख मिळाली. मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये एकूण २१ बटालियन आहेत. विशेष म्हणजे लाईट इन्फंट्रीकडे टँक व अवजड वाहने नाहियेत. लाईट इंन्फंट्रीची पदवी जिंकणारी भारतीय सैन्याची पहिली रेजिमेंट ही मराठा लाईट इंन्फट्री आहे.

१८४१ ला अफगान युद्धात त्यांनी जी कामगिरी केली होती त्या कामगिरीनंतर त्यांना ही पदवी देण्यात आली होती. पहिल्या महायुद्धानंतर मराठा एलआयने १५ सन्मान मिळवले होते. मराठा एलआयची मुलभूत तत्वे आहेत कर्तव्य, सन्माम आणि धैर्य.

मराठा एलआय ही एकमेव रेजिमेंट आहे ज्यांच्या रेजिमेंट सेंटरलाही सन्मान मिळाला आहे. मराठा एलआयच्या लोगोमध्ये युद्धाचा रणशिंग असून त्यावर अशोकस्तंभ आहे. हेच प्रतिक मराठा एलआयच्या सैनिकांच्या डोक्यावर सजवलेले आहे.

यात हिरव्या आणि लाल रंगाचे पंख असतात जे मराठा एलआयची ओळख करून देतात. मराठा एलआयच्या मार्च पास्टला सिंहगड म्हणून संबोधतात. मराठा एलआयला ५ अशोक चक्र, ५ महावीर चक्र आणि १५ कीर्ती चक्र देण्यात आले आहेत. मराठा एलआयला २५० वर्षे झाली आहेत.

ही सर्वात जुनी रेजिमेंट आहे. मराठा इंन्फट्रीने पहिल्या महायुद्धात २ व्हिक्टोरीया पदक मिळवले आहेत. हा ब्रिटीशकाळातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

महत्वाच्या बातम्या
शिक्षकांनी हाती घेतला समाजसेवेचा वसा; कोरोना रुग्णांसाठी उभारलं ७० ऑक्सिजन बेडचं कोविड सेंटर
हार घालताना नवरीची ही छोटीशी मागणी पुर्ण करु शकला नाही नवरदेव; नवरीने लग्नालाच दिला नकार
लग्नाला २०० गाई वऱ्हाडी, जेवणाला पुरणपोळीचा बेत; लातूरच्या लग्नाची राज्यभरात चर्चा
लस घेताना फालतू नाटकं करणाऱ्या मुलीला डाॅक्टरांनी झापले, म्हणाले चल निघ इथून..;पहा हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.