मराठा आंदोलनाचा भडका! मंत्री शंभूराज देसाईंच्या घरावर फेकले शेण, कार्यालयही फोडले

सातारा । सुप्रीम कोर्टाने नुकताच मराठा आरक्षणावर निकाल दिला. हे आरक्षण रद्द करण्याचे आदेश कोर्टाने दिले. यामुळे आता मराठा समाज आक्रमक झाला आहे. या निर्णयामुळे राज्यातील मराठा समाजात मोठी संतापाची लाट पसरली आहे.

याचे पडसाद साताऱ्यात उमटले, या निर्णयाविरोधात काही अज्ञातांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस कार्यालयावर दगडफेक केली आहे. तसेच गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांच्या साताऱ्याच्या निवासस्थानाबाहेर कोणीतरी शेणाच्या गोवऱ्या फेकल्या असून पोलीस याचा तपास करत आहेत.

अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणावर निकालाची तारीख दिली जात होती. अखेर याचा निकाल देण्यात आला. यामुळे मराठा समाज नाराज झाला असून आता पून्हा एकदा आंदोलन पेटण्याची शक्यता आहे.

यामुळे साताऱ्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीसह काँग्रेस सातारा जिल्हा कार्यालयावर दगडफेक केली. यावेळी सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या. यामुळे पूढे देखील हे आंदोलन पेलण्याची शक्यता आहे.

गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील निवासस्थाने देखील अज्ञातांनी शेण फेकले. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलिस फोर्स दाखल झाले. राज्यात आता मोठे मोर्चे निघण्याची शक्यता आहे.

खासदार संभाजीराजे यांनी शांतता ठेवण्याचे आवाहन केले आहे. कोरोना असल्याने त्यांनी समाजाला आवाहन केले आहे. मात्र मराठा समाजाने पुन्हा एकदा आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे.

ताज्या बातम्या

बापाची अस्थी घेण्यासाठी आलेल्या तीन लेकांमध्ये स्मशानभूमीतचं संपत्तीवरून तुफान हाणामारी

सुरेश रैनाने ट्विट करत ऑक्सीजन मागीतला; सोनू सूद म्हणाला १० मिनीटांत पाठवतो भावा

कपिल शर्मा फेम सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसलेवर पोलिसांनी केला गुन्हा दाखल; वाचा संपुर्ण प्रकरण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.