Share

मराठा क्रांती मोर्चा आक्रमक! वर्षापुर्वीच्या ‘त्या’ प्रकरणात सदावर्तेच्या पत्नीला अटक करण्याची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर काल एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत शरद पवार(Sharad Pawar) यांच्या घरात घुसण्याचा देखील प्रयत्न केला होता. या हल्ल्याच्या प्रकरणात सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे मुंबई पोलिसांनी ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली होती.(maratah kranti morcha demand to arrest adv sadvarte wife jayshri patil)

या अटकेनंतर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी ॲड. जयश्री पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यादरम्यान मराठा क्रांती मोर्चाने ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी ॲड. जयश्री पाटील यांना अटक करण्याची मागणी केली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी प्रशासनाकडे यासंदर्भात विनंती केली आहे.

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार म्हणाले की, “मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल जयश्री पाटील यांच्याविरोधात वर्षभरापूर्वी तक्रार दिली आहे. पण पोलिसांनी अजून कोणतीच कारवाई केली नाही. प्रसार माध्यमांसमोर बेताल वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवणाऱ्या जयश्री पाटील यांनी मराठा समाजाची बदनामी केली आहे.”

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार पुढे म्हणाले की, “जर वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक होत असेल तर त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना देखील अटक करण्यात यावी. गेल्या तीन वर्षांपासून जयश्री पाटील मराठा समाजाची विटंबना करत आहेत. आम्ही या प्रकरणात पोलिसांकडे तक्रार देखील दाखल केली आहे.”

“न्यायालयाने आणि प्रशासनाने आमच्या तक्रारीची दखल घ्यावी आणि लवकरात लवकर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी ॲड. जयश्री पाटील यांना अटक करावी”, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी केली आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधातील पुरावे द्यायला आम्ही तयार आहोत, असे देखील वीरेंद्र पवार यांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी काल एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं. यावेळी काही आंदोलनकर्त्यांनी शरद पवार यांच्या घरावर दगडफेक देखील केली होती. तसेच एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या चपलांचे जोडे शरद पवार यांच्या घराच्या दिशेने फेकले होते.

महत्वाच्या बातम्या :-
शरद पवारांच्या घरावर हल्ल्यासाठी पुण्यातून आणले भाडोत्री माणसं, पोलीस तपासात झालं निष्पन्न
शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याची चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा देणार – आदित्य ठाकरे
“पवार साहेब आता तरी संन्यास घ्या अन् गप्प घरी बसा”; भाजपची जहरी टीका

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now