‘हे’ गाणे ऐकल्यावर अनेक लोकांनी केल्या होत्या आत्महत्या; तब्बल ६२ वर्षे गाण्यावर होती बंदी..

 

हंगेरी | माणसाच्या जीवनात संगीत हे अविभाज्य भाग बनले आहे. माणूस दुःखी असेल तर त्याला संगीत लागते, माणूस प्रेमात असेल तर त्याला रोमँटिक संगीत लागते. त्याला आनंदात नाचायचे असेल तरीही त्याला संगीताची गरज पडते.

काही लोक ताण-तणावात असताना मन हलके करण्यासाठी गाणी ऐकतात तर काही लोकांना सॅड गाणी ऐकलाही आवडतात. मात्र असे एक गाणे आहे ज्या गाण्याला आतापर्यंतचे सर्वात खिन्न गाणे म्हटले जाते.

असे म्हटले जाते की हे गाणे ऐकल्यानंतर लोक आत्महत्या करायचे. या गाण्यामुळे लोक इतके घाबरले होते, की या गाण्यावर तब्बल ६२ वर्षे बंदी घालण्यात आली होती.

हंगेरीतील संगीतकार रेजसो सेरेज यांनी १९३३ मध्ये ‘ग्लूमी संडे’ नावाचे एक गाणे तयार केले होते. असे म्हटले जाते की हे गाणे प्रेमावर आधारित आहे.

तसेच हे गाणे ऐकल्यावर मनाला एवढे भिडते की लोकांना आपल्या वेदनांची जाणीव या गाण्यातून होते. त्यामुळे हे गाणे ऐकल्यानंतर अनेक लोकांनी आत्महत्या केल्या होत्या.

सातत्याने होत असणाऱ्या या आत्महत्यांमुळे या गाण्याला लोक वाईट म्हणू लागले. यानंतर या गाण्याला तब्बल ६२ वर्षे बंदी घालण्यात आली होती.

आत्महत्या रोखण्यासाठी हे गाणे रिकंपोजही करण्यात आले होते. मात्र आत्महत्या सुरूच होत्या, त्यानंतर १९४१ मध्ये या गाण्यावर बंदी घालण्यात आली. ही बंदी २००३ मध्ये हटवण्यात आली.

दरम्यान, हे गाणे आजही युट्युबवर आहे, मात्र अनेक लोकांना हे आजही लक्षात येत नाही की हे गाणे ऐकल्यानंतर लोक आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलायचे. तसेच असे म्हटले जाते की, गाण्याचे लेखक रेजसो सेरेस यांनी आपल्या प्रेयसीच्या प्रेमात हे गाणे लिहले होते.

रेजसो आपली ओळख निर्माण करण्यासाठी संघर्ष करत होते. मात्र त्यांना यश मिळत नसल्याने त्यांची प्रेयसी त्यांना सोडून गेली होती. त्यामुळे त्यांना प्रेमात मोठा धक्का बसला होता आणि त्यानंतर त्यांनी प्रेयसीच्या आठवणीत हे गाणे लिहले होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.