विश्व सुंदरी मानूषी चिल्लर लवकरच करणार बॉलीवूडमध्ये डेब्यू; ‘या’ चित्रपटात करत आहे काम

पुर्व विश्व सुंदरी मानूषी चिल्लर २४ वर्षांची झाली आहे. विसाव्या वर्षी मानूषीने विश्व सुंदरीचा ताज जिंकला होता. प्रियंका चोप्रानंतर सतरा वर्षांनंतर मानूषीने मिस इंडीयाचा ताज जिंकून एक नवीन इतिहास रचला होता. मिस इंडीया बनण्यापूर्वी मानूषी मेडीकलचे शिक्षण घेत होती. जाणून घेऊया तिच्याबद्दल काही रोचक गोष्टी.

मानूषीचा जन्म हरियाणामध्ये झाला होता. मानूषीचे वडील वैज्ञानिक आहेत तर आई प्रोफेसर आहे. मानूषीला मोठी बहीण आणि छोटा भाऊ आहे. तिच्या बहीणीचे देवांगना आहे तर भावाचे नाव दलमित चिल्लर आहे. मानूषी लवकरच बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.

मानूषीने तिच्या मॉडेलिंग करिअरची सुरुवात हरियाणापासून केली होती. मानूषीने मॉडेलिंग सुरु केली त्यावेळी ती मेडिकलचे शिक्षण घेत होती. त्यावेळी मानूषी एमबीबीएसचे शिक्षण घेत होती. तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असताना मानूषी मिस हरियाणा झाली होती.

त्यानंतर तिने विश्व सुंदरीच्या स्पर्धेसाठी एक वर्ष शिक्षणात ब्रेक घेतला होता. मिस इंडीयाचा ताज जिंकल्यानंतर तिने तिचे शिक्षण पुर्ण केले. गेल्या दोन वर्षांपासून ती मुंबईत राहत आहे. मुंबईच्या एकदम पॉश एरियात मानूषी तिच्या कुटूंबासोबत राहते.

विश्व सुंदरी झाल्यापासून मानूषीचे सगळे आयूष्य बदलून गेले आहे. ती अनेक सामाजिक काम देखील करत आहे. त्यासोबतच ती तिच्या करिअरवर लक्ष देत आहे. मानूषी लवकरच बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे. तिने बॉलीवूडमध्ये प्रवेश करण्याची सगळी तयारी केली आहे.

मानूषी यश राज फिल्म्सच्या ‘पृथ्वीराज’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे. मानूषीने चित्रपटाची शुटींग सुरु केली आहे. चित्रपटांसोबतच मानूषीला पुस्तके आणि पेटींगची खुप जास्त आवड आहे. ज्याप्रकारे तिने तिच्या सौंदर्याने सर्वांना वेडं लावले आहे. त्याच प्रकारे ती तिच्य अभिनयाने सर्वांना वेड लावेल का हे बघणे मजेशीर असेल.

महत्वाच्या बातम्या –
घटस्फोटानंतरही अभिनेत्री पुजा बेदी आहे तब्बल ‘एवढ्या’ करोडची मालकिण; जाणून घ्या..
माधुरी दीक्षितच्या आई वडिलांनी सुरेश वाडकर यांच्याकडे लग्नाचा प्रस्ताव पाठवला आणि…
‘शोले’ चित्रपटातील रहिम चाचाने तीन वर्ष पाकिस्तानच्या जेलमध्ये काढले होते कारण…
सैराटफेम आर्चीला मनापासून आवडतो ‘हा’ अभिनेता, स्वत: तिनेच उघड केलं गुपित, नाव ऐकून थक्क व्हाल!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.