मुंबई पोलिसातील ‘त्या’ अधिकाऱ्याकडे केस गेल्याने वाझे घाबरले आणि त्यांनी मनसुखला संपवले

मनसुख हिरेन मृत्यु प्रकरणात एनआयएच्या हाती नवीन माहिती लागली आहे. असे म्हटले जात आहे की सचिन वाझे यांनी मनसुखला का संपवलं याचे खरे कारण समोर आले आहे. एनआयनेने या संदर्भात एका पोलिस कॉन्स्टेबल आणि एका हॉटेल व्यवसायिकाचा जबाब नोंदवून घेतला आहे.

हे दोन्ही जबाब आणि मनसुख हिरेन यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीच्या आधारे एनआयनेने या प्रकरणाचा छडा लावला आहे. एनआयनेच्या म्हणण्यानुसार, जेव्हा अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडली होती तेव्हा सचिन वाझे यांनी मनसुख हिरेनला आत्मसमर्पन करण्यास सांगितले होते.

मी तुला दोन ते तीन दिवसांत जामिनावर बाहेर काढेन असेही वाझे मनसुखला म्हणाले होते. मनसुखने ही गोष्ट आपल्या पत्नीला सांगितली होती. वाझे यांनी सांगूनसुद्धा मनसुख काही ऐकायला तयार नव्हता. आपण ही केस बोकांडीवर का घ्यावी असे म्हणत त्याने वाझेंकडे नाराजी व्यक्त केली होती.

त्यानंतर मनसुख हिरेन आपल्या घरी निघून गेले होते. त्यानंतरच्या काळात २ मार्च रोजी हे प्रकरण एसीपी नितीन अलकपुरे यांच्याकडे देण्यात आले. तेव्हा ते स्कॉर्पिओच्या चौकशीसाठी मनसुख हिरेनला बोलावतील हे सगळ्यांनाच माहित होते.

नितिन यांनी जर मनसुखकडे चौकशी केली तर माझे भांडे फुटेल अशी भिती वाझेंना वाटत होती. त्यानंतर सगळा प्लॅन आखला गेला. ४ मार्चला विनायक शिंदे यांनी बनावट सीम वापरून मनसुख हिरेनला फोन केला.

त्यांनी मी पोलिस अधिकारी तावडे बोलतोय असे सांगत हिरेनला घोडबंदर येथे बोलावून घेतले. त्यानंतर त्याची हत्या करून त्याचा मृतदेह खाडीत फेकून देण्यात आला. मनसुखे हिरेन याने एसीपी अलकपुरे यांच्याकडे जबाब नोंदवू नये यासाठीच त्याचा खुन सचिन वाझे यांनी केला हे स्पष्ट झाले आहे.

महत्वाच्या बातम्या
उगाच धमक्या देण्यापेक्षा सत्तेच्या बाहेर पडून दाखवा, पटोलेंना राष्ट्रवादीने खडसावले
ना मास्क ना सोशल डिस्टनसिंग, खासदार नवनीत राणा यांनी धरला ठेका; पहा व्हिडीओ
..त्यामुळे सचिन वाझेंनी मनसुख हिरेनचा काटा काढला, अखेर खरे कारण आले समोर
‘मनसेकडून आमदारकी लढवलेल्या ‘या’ प्रसिद्ध गायिकेने केला राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.