मनसुख हिरेन प्रकरणाचे गुजरात कनेक्शन उघड? व्हॉट्सऍप कॉलमुळे दोन आरोपी ATS च्या जाळ्यात

मनसुख हिरेन मृत्यु प्रकरणावरून राज्यातले राजकारण तापलेले आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी एटीएस कसून प्रयत्न करत आहे. या प्रकरणात एटीएसने दोन जणांना अटक केली आहे. त्यामुळे असे बोलले जात आहे की या प्रकरणाचा एटीएसने छडा लावण्यात एटीएसला यश आले आहे.

कारण या प्रकरणात आता अहमदाबाद कनेक्शन सापडले आहे. मनसुख हिरेन यांना ४ तारखेला रात्री एक व्हॉट्स कॉल झाला होता. मनसुख यांना आलेला हा शेवटचा कॉल होता. फोन करणारा म्हणाला की, मी गुन्हे अन्वेषण शाखेचा अधिकारी तावडे बोलतोय.

त्याने हिरेन यांना भेटायला बोलावले होते. अशी माहिती सुत्रांकडून मिळाली होती. या प्रकरणाचा तपास करताना एटीएसने हिरेन यांचा पुर्ण कॉप रेकॉर्ड तपासला. परंतु तरीही त्यांच्या हाती काहीच माहिती लागत नव्हती.

त्यानंतर व्हॉट्स कॉल डिटेल्स चेक केल्यानंतर त्यांच्या हाती काही नंबर लागले. त्यातील शेवटचा आलेल्या कॉलवर एटीएसला संशय आला. त्यांनी त्या कॉलची डिटेल्स काढली आणि त्या कॉलचे कनेक्शन अहमदाबादशी असल्याचे दिसून आले अशी माहिती सुत्रांनी सांगितली.

यानंतर एटीएसचे अधिकारी अहमदाबादला रवाना झाले. एका बुकीचा हा नंबर असल्याची माहिती एटीएसला समजली. त्यानंतर बुकी नरेश गोरचाही शोध लागला. पोलिसांना त्याला ताब्यात घेतलं. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने कबूल केलं की त्याने पाच नंबर सचिन वाझे यांना दिले होते.

या पाचपैकी एक नंबर सचिन वाझेंनी मनसुख यांच्या मारेकऱ्यांना दिला होता. या पाचही नंबरची चौकशी केल्यानंतर एटीएसनी निलंबित पोलिस अधिकारी विनायक शिंदेला अटक केली. शिंदेने आपण तावडे बोलत असल्याचं सांगत हिरेन यांना भेटायला बोलावले होते.

जेव्हा मनसुख यांची हत्या झाली तेव्हा गाडीमध्ये एकापेक्षा जास्त लोक होते. त्यामध्ये हा शिंदेही होता. बाकी सर्वजण फरार असून एटीएस त्यांचा तपास करत आहे. या प्रकरणात एकूण ११ जणांचा समावेश आहे असून त्यात अनेक निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.