मानसी नाईकने पती प्रदीप रावांसाठी घेतला खास उखाणा; वाचून तुम्हाला वाटेल कौतुक

मुंबई | मराठी अभिनेत्री मानसी नाईक हिचा नुकताच विवाह सोहळा पार पडला. मराठी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नृत्यांगना व अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. तिचा विवाह १९ जानेवारी २०२१ रोजी प्रदीप खरेरा याच्यासोबत झाला आहे.

मानसी आणि प्रदिपच्या लग्न सोहळ्याची सोशल मीडियावर खुप चर्चा रंगली होती. प्रदीप खरेरा एक आंतरराष्ट्रीय बॉक्सर आहे. मानसी नाईकने मराठी चित्रपटसृष्टीत अनेक हिट गाणी दिली आहेत. हे दोघेही लग्नाच्या आधी बरेच महिने एकमेकांच्य प्रेमात होते.

नुकतेच मानसीने फोटो शेअर करत उखाणा घेतला आहे. तिने फोटो शेअर करत म्हटले की, ‘मंदिरात वाहते, फुल आणि पान प्रदीप रावांचे नांव घेते, ठेवून सर्वांचा मान.’ मानसी नाईकच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसतो आहे.

दरम्यान, या फोटोंमध्ये तिने निळ्या रंगाची साडी नेसली असून ती या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. हे फोटो शेअर करत तिने उखाणा घेतला आहे. यापूर्वी मानसीच्या आईने उखाणा घेतलेला व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत होता.

महत्त्वाच्या बातम्या
शरद पवारांचा सचिन तेंडुलकरला सल्ला; “आपलं क्षेत्र सोडून इतर विषयांवर बोलताना…”
सचिनकडून भारतरत्न सन्मानाचा अपमान; पहिल्यांदाच राजकीय नेत्याकडून टिका
रणविर शौरीनं गाण्यातून साधला रिहानावर निशाणा; ‘रिहाना तो बहाना है..पप्पू को PM बनाना है’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.