बाबो! मानसी नाईकने शेअर केला ‘तो’ व्हिडीओ; सोशल मिडीयावर घालतोय तुफान धुमाकूळ

मुंबई | नुकताच मराठी अभिनेत्री मानसी नाईक हिचा विवाह सोहळा पार पडला. मराठी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नृत्यांगना व अभिनेत्री अशी तिची ओळख आहे. तिचा विवाह १९ जानेवारी २०२१ रोजी प्रदीप खरेरा याच्यासोबत झाला आहे. मानसी आणि प्रदिपच्या लग्न सोहळ्याची सोशल मीडियावर खुप चर्चा रंगली होती.

नुकताच मानसीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ फरीदाबादचा आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, ससुराल हो तो ऐसा..दुल्हन वही अच्छी जो पिया मन भाये, ससुराल वही अच्छी जहाँ मायके की याद न आये…लव्ह यू इंडिया. ये भारत की बेटी है, दोनो मेरे अपने है..माझा महाराष्ट्र आणि खूप प्रेम माझ्या हरियाणाला.

मानसी नाईकने पती प्रदीप रावांसाठी घेतला खास उखाणा…
काही दिवसांपूर्वीच  मानसीने फोटो शेअर करत उखाणा घेतला होता. तिने फोटो शेअर करत म्हटले होते की, ‘मंदिरात वाहते, फुल आणि पान प्रदीप रावांचे नांव घेते, ठेवून सर्वांचा मान.’ मानसी नाईकच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला होता.

मानसी आणि प्रदिपच्या लग्नाची सर्वांनाच उत्सुकता होती. प्रदीप खरेरा एक आंतरराष्ट्रीय बॉक्सर आहे. मानसी नाईकने मराठी चित्रपटसृष्टीत अनेक हिट गाणी दिली आहेत. हे दोघेही लग्नाच्या आधी बरेच महिने एकमेकांच्य प्रेमात होते.

याशिवाय मानसीने तिच्या लग्नसोहळ्याचा एक टीझर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तसेच या व्हिडीओमध्ये तिच्या लग्नसोहळ्यातील प्रत्येक विधींवर, कार्यक्रमांवर विशेष प्रकाश टाकण्यात आला आहे. यात मानसीच्या मेहंदीपासून ते संगीतपर्यंत आणि हळदीपासून ते पाठवणीपर्यंत प्रत्येक गोष्ट या व्हिडीओत दिसून येत आहे.

दरम्यान, मानसी आणि प्रदिपच्या लग्न सोहळ्याची सोशल मीडियावर खुप चर्चा रंगली होती. प्रदीप खरेरा एक आंतरराष्ट्रीय बॉक्सर आहे. मानसी नाईकने मराठी चित्रपटसृष्टीत अनेक हिट गाणी दिली आहेत. हे दोघेही लग्नाच्या आधी बरेच महिने एकमेकांच्य प्रेमात होते.

नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच मराठी सिनेसृष्टीमध्ये लगीनसराई सुरु झाली होती. याशिवाय अनेक अभिनेत्यांची लगीनघाई सुरु आहे. यामध्ये मानसी नाईक, मिताली मयेकर, सई लोकूर असे अनेक कलाकार यावेळी लग्नबंधनात अडकले आहेत. यानंतर नुकतेच या यादीत अभिनेता आस्ताद काळे आणि अभिनेत्री स्वप्नाली पाटीलच्या नावाचाही समावेश झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
कंगना मागणार का शेतकऱ्यांची माफी? काँग्रेस नेत्यांची धमकी; ‘शेतकऱ्यांची माफी माग नाहीतर…’
भाजपाचा इशारा; ‘शिवजयंती उत्साहात साजरी करू द्यावी, अन्यथा…’
यंदा शिवजयंती साधेपणाने होणार साजरी; वाचा कुठले नियम पाळावे लागतील?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.