अभिनेत्री मानसी नाईक अडकली लग्नबंधनात; लग्नाचे फोटो झाले व्हायरल

नवीन वर्षाची सुरुवात होऊन २० दिवसच झाले आहेत. पण या २० दिवसांमध्ये मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार लग्न बंधनात अडकले आहेत. मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक देखील २० जानेवारीला विवाहबंधनात अडकली आहे.

‘वाट माझी बघतोय रिक्क्षावाला..’ गाण्यावर सर्वांना नाचवणाऱ्या मानसीने नाईकने लग्न केले आहे. मानसीने बॉक्सर आणि मॉडेल प्रदीप खरेरासोबत लग्न केले आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दोघांचा साखरपुडा झाला होता.

गेले अनेक दिवस मानसी आणि प्रदीप एकमेकांना डेट करत होते. पण कोरोनामूळे दोघांनी लग्न पुढे ढकलले होते. २०२१ च्या सुरुवातीला दोघांनी कुटुंबाच्या आणि मित्रांच्या साक्षीने लग्न केले आहे. कोरोनामूळे दोघांच्या लग्नात काही मोजक्या लोकांची उपस्थिती होती.

 

साखरपुड्यानंतर मानसीला सतत लग्नाबद्दल प्रश्न विचारले जात होते. कोरोना काळ संपल्यानंतर मानसीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. मानसीच्या लग्नातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मानसीचा लग्नातील लुक प्रेक्षकांना खुप जास्त आवडला. तिच्या हा लुक जोधा अकबर चित्रपटातील ऐश्वर्यासारखा होता. त्यामुळे तिच्या या लुकला चाहत्यांनी चांगलेच पसंत केले आहे. लग्नानंतर मानसी खरेरा झाली आहे.

महत्वाच्या बातम्या –

पुजा सावंतचे साडीतील फोटो पाहून चाहते झाले घायाळ; म्हणाले तु…

५० वर्षांची मलायका हॉट आणि फिट दिसण्यासाठी रोज न चुकता करते ‘ह्या’ गोष्टी

८० च्या दशकातील बालकलाकार बेबी गुड्डू आता अशी दिसतेय की डोळ्यांवर विश्वास बसनार नाही

‘मकडी’ चित्रपटातील ‘ही’ बालकलाकार आठवते का? से’क्स रॅकेटमध्ये करण्यात आली होती अटक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.