तुम्ही मला बुधवार पेठेत कधी पाहिलं? तुम्ही काय करत होता तिथे? युजरच्या कमेंटवर संतापली मानसी नाईक

सोशल मिडियावर सेलिब्रेटी फोटो, व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या मनावर राज्य करत असतात. कधी कधी सेलिब्रेटींना नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. सेलिब्रेटीही ट्रोलिंगला सडेतोड उत्तर देत असतात.

आपल्या अभिनयाने संपुर्ण महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या मराठी अभिनेत्री मानसी नाईकलाही एका नेटकऱ्याने ट्रोल केले होते. मानसीनेही त्या ट्रोलरचा चांगलाच समाचार घेतला आहे.  बाई वाड्यावर या आणि बघतोय रिक्षावाला गाण्यात नृत्य करत आपल्या कलेने संपुर्ण महाराष्ट्रात मानसी नाईकने धुमाकूळ घातला आहे.

मानसी नाईक सोशल मिडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. पती प्रदीप खरेरासोबत ती तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. अशाच एका फोटोवर नेटकऱ्याने अश्लिल भाषेत कमेंट केली होती. त्या नेटकऱ्याला मानसी नाईकने लाइव्ह सेशनमध्ये उत्तर दिले आहे.

मानसी म्हणाली, तुम्ही मला बुधवार पेठेत बघायला कधी गेला होतात?  तुम्ही तिथे काय करत होतात? बुधवारपेठ ही जागा ज्या बायका चालवतात. तुम्हाला काय वाटतं ते तिथे का आहेत. ते स्वत:च पोट भरतात. मेहनत करतात. त्यांना स्वत:च अस्तित्व आहे. तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही काम करून दाखवा. असं मानसी नाईक म्हणाली आहे.

अभिनेत्री मानसी नाईक ही मुळची पुण्याची आहे. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून तिने तिचे शिक्षण पुर्ण केले आहे. मानसीने मॉडलिंग करत अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. जबरदस्त, तुक्या तुकविला नाग्या नाचविला, फक्त लढ म्हणा, कुटुंब, कोकणस्थ, वज्र या चित्रपटांमध्ये तिने भूमिका निभावल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
‘तिरंगा’मध्ये नाना पाटेकर ऐवजी दिसले असते रजनीकांत; पण ‘या’ कारणामुळे दिला नकार
‘लव्ह स्टोरी’ फेम अभिनेत्री विजेता पंडितची झाली आहे खुपच वाईट अवस्था; आर्थिक अडचणींचा करत आहे सामना
…म्हणून अभिनेत्री आयशा झुल्काने कधीच आई न होण्याचा निर्णय घेतला; कारण वाचून धक्का बसेल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.