लग्नानंतरचा मानसी नाईक आणि प्रदीप खरेराचा ‘हा’ रोमँटिक व्हिडीओ एकदा पहाच..

मुंबई : काही दिवसांपूर्वीच लग्न बंधनात अडकलेली अभिनेत्री मानसी नाईक सध्या सोशल मीडियावर आपला जलवा दाखवतीये. नवनवीन फोटो व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत आहे. नेहमीच तिच्या फोटोंवर लाईक्सचा पाऊस पडत असतो.

अशातच मानसी नाईक आणि प्रदीप खरेराचे पहिले गाणे वाटेवरी मोगरा रिलीज झाले आहे. मानसीने या गाण्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. नवीनच लग्न झालेल्या मानसी सोबत तिचा नवरा प्रदीप खरेरा यात तिच्यासोबत असल्यामुळेच हा म्युझिक विडिओ अजूनच खास झाला आहे.

वाटेवरी मोगरा असे या म्युझिक अल्बमचे नाव आहे. याची निर्मिती सागरीका म्युझिकने केली आहे. तसेच हे गाणे वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांनी गायले आहे. मानसीने तिच्या नवीन म्युझिक अल्बम वाटेवरी मोगराचा टीझर शेअर करत लिहिले की, ‘आता आमचे स्वतःचे प्रेम गीत आहे. लवकरच येणार भेटीला.’

दरम्यान, मानसीचा नवरा प्रदीप खरेरा हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. प्रदीप त्याच्या सोशल मीडियावर नेहमीच त्याचे फोटो पोस्ट करत असतो. तो इन्स्टाग्रामवर नेहमीच सक्रिय असतो. त्याला इन्स्टाग्रामवर पाच लाखांहून अधिक जण फॉलो करतात.

महत्त्वाच्या बातम्या 

अंबानींनी तक्रार दाखल केलीय का? वाझेंच्या अटकेबाबत असीम सरोदेंनी उपस्थित केले ‘हे’ प्रश्न

इथे कोरोना वाढतोय आणि तुम्ही लस दुसऱ्या देशांना का वाटत बसलाय? कोर्टाने मोदी सरकारला झापले

दिलदार इशान! सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर इशानने जे केले त्याचा तुम्हालाही अभिमान वाटेल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.